औरंगाबादः कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) धोका ओळखून आणि राज्य सरकारने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध हॉटेल्स आणि आस्थापना 50 टक्के क्षमतेतच सुरु ठेवण्याची अट घातली होती. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या (Hotels in Aurangabad) उदयोगावर परिणाम होत होता. तसेच हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचेही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आजपासून म्हणजेच 9 फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील हॉटेल्सच्या वेळा वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडे मंगळवारी हॉटेल असोसिएशनची बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर जिल्ह्यात पर्यटनासह उद्योग वृद्धी व बेरोजगारी कमी करण्यासाठी हॉटेल्सच्या वेळा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
– हॉटेल्समध्ये 50 टक्के टेबलवरच फूड सर्व्हिस देण्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र हॉटेल सुरु राहण्याची वेळ वाढवण्यात आली आहे.
– हॉटेल्स 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर सुरु राहिलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येईल.
– आजापासून शहरातील पर्सिद्ध सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय देखील सुरु करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. महापालिकेला येथील तिकिटापोटी दररोज एक लाख रुपये येतात. त्यामुळे आता उद्यानदेखील पूर्वीप्रमाणे सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
– शहरातील शाळांचे पाचवी ते सातवीचे वर्ग मंगळवारपासून सुरु झाले आहेत. शाळांमध्ये सुरुवातीला 30 टक्केच उपस्थिती दिसून आली. मात्र हळू हळू विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-लसीकरणाबाबतचे नियम सर्वच ठिकाणी तसेच ठेवण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावण्यासाठी कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेणे बंधन कारक करण्यात आलेले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढलेली दिसून आली. मंगळवारी जिल्ह्यात 158 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी शहरात 108 तर ग्रामीण भागात 50 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. शहरात मागील 24 तासात दोन जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.
मंगळवारी म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे-
जालना- 43
परभणी- 89
नांदेड-131
हिंगोली- 142
बीड- 115
लातूर- 157
उस्मानाबाद- 137
इतर बातम्या-