औरंगाबाद : जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क डॉक्टरनेच (Doctor) दारू पिऊन रुग्णालयात (Hospital) गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या बाजारसांवगी येथील आरोग्य केंद्रामधील ही घटना आहे. नशेमध्ये बेफाम झालेल्या डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर त्याने उपचारासाठी आलेल्या संबंधित रुग्णाला शिविगाळ देखील केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच्या सहकारी डॉक्टरांनी संबंधित डॉक्टरला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील या डॉक्टरची शिविगाळ सूरूच होती. अखेर त्याच्या इतर सहकारी डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाच्या बाहेर नेले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, याचा व्हिडीओ (Video) चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत उपचारासाठी आलेल्या रुग्णाला शिविगाळ करणाऱ्या या डॉक्टरवर आता काय कारवाई होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रामधील हा सर्व प्रकार आहे. डॉक्टर दारूच्या नशेत होता. याचवेळी तिथे उपचारासाठी एक रुग्ण आला. डॉक्टरांनी या रुग्णाला शिविगाळ केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरच्या इतर साथीदारांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी या डॉक्टरला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील हा डॉक्टर ऐकत नसल्याने अखेर संबंधित डॉक्टरला उचलून बाहेर नेण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर रुग्णाला शिविगाळ करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित डॉक्टर हा दारूच्या नशेत होता. दारूच्या नशेत या डॉक्टरने रुग्णालयात गोंधळ घातल्याचे दिसून येत आहे. या प्रकारानंतर तेथील इतर डॉक्टरांनी या डॉक्टरला रुग्णालयाच्या बाहेर नेल्याचे पहायला मिळत आहे. या व्हिडीओने जिल्ह्यात गोंधळ उडाला असून, या डॉक्टरवर आता काय कारवाई होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.