शिवराज पाटील यांनी पुन्हा केलं ‘जिहाद’च समर्थन, त्यांनी थेट अर्थच सांगितला…

| Updated on: Nov 08, 2022 | 8:08 PM

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी दिल्लीनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात जिहादचं समर्थन केले आहे.

शिवराज पाटील यांनी पुन्हा केलं जिहादच समर्थन, त्यांनी थेट अर्थच सांगितला...
Follow us on

औरंगाबादः मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका पुस्तक प्रदर्शना जिहादविषयी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. दिल्लीतील त्यावेळी केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीररित्या जिहादचं समर्थन केले असल्याने त्यांच्यावर प्रचंड टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना त्यावेळी शिवराज पाटील यांनी पुन्हा एकदा जिहादचं समर्थन केले. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी जिहादचं समर्थन करताना त्यांनी यावेळी अर्थही सांगितला आहे. जिहादविषयी बोलताना ते म्हणाले की, जिहाद म्हणजे वाईटाच्या विरोधात केलेली कृती आहे.

एखादा वाईट व्यक्ती वाईट कृत्य करत असेल आणि तो बंदूक किंवा काठी घेऊन येत असेल तर त्याच्या विरोधात उठाव करणे म्हणजे जिहाद अशा प्रकारचा अर्थ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे शिवराज पाटील यांचे हे वक्तव्य पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कर्नाटक, तेलंगाना असा प्रवास करुन आता काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे राज्यासह देशातील अनेक नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत.

भारत जोडो यात्रेविषयीही शिवराज पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, राहुल गांधी यांची पदयात्रा म्हणजे सामान्य माणसाचं म्हणणे ऐकून घेणारी यात्रा आहे.

त्यामुळे यात्रेला उदंड प्रतिसाद लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षाला उभारी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.