औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील गंधेली परिसरात चारचाकी वाहनात स्फोट होऊन एका जोडपे ठार झाले आहे. मात्र चार चाकी (Four wheeler) वाहनामध्ये स्फोट (blast) कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. चारचाकी गाडीत स्फोट झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या एका महिलेचा आणि पुरूषाचा मृत्यू (Death) झाला आहे. निर्जन स्थळी झालेल्या स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे कारमध्ये झालेला स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध चिखलठाण ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
ज्या कारमध्ये स्फोट होऊन एका जोडप्याचा मृत्यू झाला ती कार गंधेली परिसरातील निर्जनस्थळी थांबवण्यात आली होती. कार थांबलेली असतानाही त्यामध्ये स्फोट कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. कार नेमकी कुणाची आहे त्याचाही शोध सुरू आहे. हा स्फोट इतका भयानक होता की, चारचाकी गाडीचे छत पूर्ण जळून खाक झाले आहे. चारचाकीला स्फोट होऊन आग लागल्यानंतर त्या गाडीसर जोडपे जळून ठार झाले आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम खूप वेळ सुरू होते.
चारचाकी गाडी निर्जनस्थळी लावूनही स्फोट झाल्याने पोलीस कसून चौकशी करत आहेत. काही दिवसांपूर्वी वाहनचोरीमुळे औरंगाबाद पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. आताही हा कारमध्ये स्फोट झाल्यामुळे चिंता वाढवली आहे. मानवी वसाहतीपासून काही अंतरावर निर्जळस्थळी या चारचाकीचा स्फोट कशामुळे झाला हा शोध सुरु आहे.
आता या चारचाकीमध्ये झालेल्या स्फोटामुळे पोलिसांची आणखी डोकेदुखी वाढली आहे. कारमध्ये झालेल्या स्फोटात ज्या जोडप्याचा मृत्यू झाला आहे त्यांचाही शोध घेणे सुरु आहे. स्फोट कशामुळे झाला याचा कसून शोध सुरु असून याबाबत काही आणखी काही माहिती मिळते का याचाही तपास पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या
ठाणे पोलिसांनी जप्त केल्या दहा बंदुकासोबत अकरा काडतुसे; 52 हजारांचा ऐवज हस्तगत
औरंगाबादः शेतकऱ्यांना लुटणाऱ्या 30-30 घोटाळ्याच्या सूत्रधाराचा जामीन नामंजूर, सत्र न्यायालयाचा निकाल
Watch Video |पुण्यात अल्पवयीन मुलांचा हिडीसपणा ; कोयत्याने केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न