औरंगाबाद – सिल्लोडच्या सभेत ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला. यावेळी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, विनोद भोसाळकर उपस्थित होते. मनीषा कायंदे म्हणाल्या, सिल्लोडकरांनी शिवसेनेची साथ सोडलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. तुम्ही म्हणजे विरोधकांनी आमचे आमदार पळविले.
मनीषा कायंदे यांनी सांगितलं की, सिल्लोडमधील काही महिलांना फोन केला. काय चाललंय तुमचं. बाई दिल्या घरी तू सुखी आहात का. त्या म्हणाल्या, ताई आम्हाला पश्चाताप होतो. अब्दुल सत्तार यांच्या मागे गेलो. आम्ही घरी बसून आहोत.
४० लोकांनी चिन्ह, नाव गोठवलं. वडिलांचं नाव कोणी गोठवतंय का. काही आमदारांना राज्यभर स्वप्नातसुद्धा खोके आवाज येतो. रात्री आवाज येतो खोके-खोके आवाज ऐकून येतो, असं मनीषा कायंदे यांनी सांगितलं. महाप्रबोधन यात्रा सिल्लोडमध्ये आली आहे. त्यानिमित्तानं त्या बोलत होत्या.
राज्यपाल कोश्यारी यांनी आधी महात्मा फुले यांचा अपमान केला. हा सावित्रीबाईं फुले यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांचा अपमान होतो. यापूर्वी राज्यपाल यांनी अशी मुक्ताफळं उधळलीत. आता राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात होते. मी आजचा छत्रपती आहे, असं म्हंटलं. काळी टोपी वाले स्वतःची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करतात.
आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. असे राज्यपाल कुणाला मान्य आहे का, असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.
राज्यपाल कोश्यारी यांना हटवा, गो बॅक गव्हर्नर अशी मागणीही कायंदे यांनी यावेळी केली. महिलांचा अपमान या एका मंत्र्यानं केला. सुप्रिया सुळे यांचा अपमान केला गेला. घाणेरड्या शिव्या दिल्या जातात. राज्यपालांकडं गेलो. त्यावर राज्यपाल हसतात. मनीषाजी फोटो के स्माईल करा, म्हणतात. असे राज्यपाल आम्हाला नको आहेत, असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं.