औरंगाबाद: लग्नासाठीचा अति उत्साह औरंगाबादमधील एक नवरदेव (Aurangabad husband) आणि त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला. हळदीच्या कार्यक्रमात विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवत या लोकांनी तलवार आणि जांबिया घेऊन डान्स करायला सुरुवात केली. आधी मित्रांनी डान्स सुरु केला आणि त्यात नवरदेवालाही ओढलं. मग काय सगळेच गाण्याच्या तालावर बेधुंद थिरकले. उत्साहाच्या भरात स्वतःचे व्हिडिओही काढले आणि सोशल मीडियावर अपलोडही केले. अर्थात पोलिसांपर्यंत (Police Arrest) या सगळ्या प्रकाराची माहिती क्षणात पोहोचली आणि सगळ्या मिरवणुकीच्या टीमची चांगलीच जिरली. त्यामुळे औरंगाबादमध्ये (Aurangabad marriage party) अतिउत्साही नवरदेवाचीच चर्चा रंगली.
हळदीचा कार्यक्रम, हातात तलवार अन् ‘मै हूं डॉन’ वर बेधुंद, औरंगाबादच्या नवरदेवाला अतिउत्साह महागात पडलाच! #Wedding #haldi #Aurangabad #crime pic.twitter.com/eIuSVPLOb1
— Anish Bendre (@BendreAnish) February 3, 2022
शहरातील पुंडलिक नगर परिसरातील रेणुकानगर या ठिकाणी बिभीषण अनिल शिंदे याच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. यात बिभीषणचा मित्र व आरटीओ एजंट वसीम अय्युब शेख याने तलवार घेऊन डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर शुभम सुरेश मोरे याने दोन जांबिये बाहेर काढून बेधुंद नाचायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत बिभीषण आणि यश पाखरे, शेख बादशहा शेख बाबा, किरण गोरख रोकडे यांनीदेखील तलवार घेऊन मोबाइलमध्ये चित्रण केले. नंतर ते सोशल मिडियावर अपलोड करताच पुंडलिक नगर पोलिसांच्या बाती लागले.
तलवार आणि जांबिया घेऊन नाचणाऱ्या या सहा जणांवर पुंडलिक नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तत्काळ स्वांना अटक करण्याचे निर्देश दिले. सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाणे, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे, पोलीस नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे आदींनी यांचा शोध घेत अटक करून हत्यारे ताब्यात घेतली. न्यायालयाने सर्वांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा तपास दादाराव राठोड करत आहेत.
इतर बातम्या-