औरंगाबाद: शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करतानाच खैरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनाही चिमटे काढले आहेत. कराड यांच्यापेक्षा माझी उंची खूप मोठी आहे. त्यांची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. (i made bhagwat karads political career, says chandrakant khaire)
चंद्रकांत खैरे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही टीका केली आहे. भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं खैरे म्हणाले.
मी दिल्लीत गेलो होतो. पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. ते येतील मला भेटायला. ते मला नेताच मानतात. मी त्यांना खूप सीनियर आहे, असं ते म्हणाले. मला ज्यांनी पाडलं त्या दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात? असा सवालही त्यांनी केला. दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता. त्यांचं काय अभिनंदन करायचं, असंही ते म्हणाले.
शिवसेनेला काटशह देण्यासाठी कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं असेल तर चांगलं आहे. बरं आहे ना उलटं. ते दिल्याने आमच्याही लक्षात येतं. आमचे कार्यकर्तेही खडबडून जागे होतात आणि कामाला लागतात. त्यांना लोकसभेचं तिकिट दिलं तरी काहीच हरकत नाही. शिवसेनेची ही जागा आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. युतीतही शिवसेनेची जागा होती. महाविकास आघाडीतही शिवसेनेचीच जागा आहे, असं सांगतानाच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. (i made bhagwat karads political career, says chandrakant khaire)
संबंधित बातम्या:
VIDEO: दानवेंनी रुग्णालयात बसून पैसे वाटले, माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट
जातीवाचक शिविगाळ, विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर मनसे काय करणार? गजानन काळेंवर कारवाई होणार?
(i made bhagwat karads political career, says chandrakant khaire)