औरंगाबाद: सध्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे, अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर (Rivers flood) आल्यामुळे परिसर पुरमय झाले आहेत, तर संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे तर काही धरणं भरली आहेत, महाराष्ट्रातील महत्वाच्या धरणांपैकी जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) हे एक महत्वाचे धरण आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने औरंगाबादमधीलही अनेक नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 75 टक्क्यांवर (water storage of the dam is now 75 percent) पोहचला आहे.
त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचे प्रमाण असेच राहिले तर धरणाचा पाणीसाठी लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने जायकडवाडी धरणाचा फायदा होणारे जे पाच जिल्हे आहेत ते सुखावले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर येऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र राज्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले आणि विहिरींच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला असून अल्पावधीतच जायकवाडी धरणाचा पाणीसाठी 35 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांवर गेला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना यावर्षी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे दिसत आहे. पावसाचे प्रमाण जर असेच काही दिवस राहिले तर येथील नद्या नाल्यांसह धरणाच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढ होणार असल्याचे दिसत आहे. धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे 10 दिवसात जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 35 टक्क्यांवरुन थेट 75 टक्क्यांवर पोहचला आहे.
जायकवाडी धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे गेल्या दहा दिवसात पडलेल्या पावसामुळे 40 टक्के पाणीसाठा वाढला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ही औरंगाबादकरांसाठी चांगली गोष्ट असल्याचेही बोलले जात आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पाणी पातळीत चाळीस टक्के पाणी पातळी वाढली आहे.
गेल्या काही दिवसाप्रमाणे पावसाचे प्रमाण असेच चालू राहिले तर जायकवाडी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने औरंगाबादमधील पाच जिल्हे सुखावले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसा झाले आहे. मात्र नदी, नाले आणि विहीरींच्या पाणीपातळीत मात्र प्रचंड वाढ झाली आहे.
जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचं धरण असल्याची ओळख आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याचा पाच जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाच जिल्ह्यांसह परिसरातील नागरिकांना त्यांचा फायदा होणार आहे. जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असल्याची त्याची ओळख आहे. संततधार पाऊस दीर्घकाळ असेल तर हे मोठं मातीचं धरण भरून वाहतं
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नाशिक, परभणी, नांदेड या भागातील नागरिकांना आता जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या पाच जिल्ह्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे सध्या धरण परिसरातील नागरिक सुखावले आहेत. आणि काही दिवस पावसाचे प्रमाण असेच चालू राहिले तर लवकरच धरण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.