संभाजीनगर : महाविकास आघाडीची आज पहिली संयुक्त सभा संभाजीनगरमध्ये होत आहे. या सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सभेला वज्रमूठ सभा असं नाव देण्यात आलं आहे. संपूर्ण मराठवाड्यातून या सभेला लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सभेला लोकांनी यावं म्हणून दवंडी दिली जात आहे. मुस्लिम बांधवही या सभेला एकवटणार आहे. संभाजीनगरात झालेला दोन गटातील राडा, त्यानंतर झालेलं तणावाचं वातावरण, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्त्व प्राप्त झालं आहे. या सभेतून तिन्ही नेत्यांच्या वज्रमुठीचे प्रहार कुणावर आदळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीची आज शहरात विराट जाहीर सभा होत आहे. महाविकास आघाडीच्या या सभेला वज्रमुठ सभा असे नाव देण्यात आलं आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार जाहीर सभा होत आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून या सभेला सुरुवात होणार आहे. सभेला महाविकास आघडीतील डझनभर बडे नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार धनंजय मुंडे, अमित देशमुख, सुभाष देसाई, अनिल परब, सुनील प्रभू, राजेश टोपे आदी नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
या सभेला येण्याचं आवतन दिलं जात आहे. संपूर्ण शहरात दवंडी देऊन नागरिकांना सभेला येण्याचं आवतन दिलं जात आहे. सरकारमधील मंत्री आणि नेत्यांचा पर्दाफाश केला जाणार आहे. त्यामुळे या सभेला या असं दवंडी देणारा सांगत आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मोठमोठे पोस्टर लागले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांचे पोस्टर संपूर्ण शहरभर लागले आहेत. याशिवाय सभा परिसरात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे झेंडेही लागले आहेत.
महाविकास आघाडीच्या सभेला मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला आहे. मुस्लिम बांधवांनी मैदानावर येऊन आयोजकांची भेट घेतली. तसेच या सभेला पाठिंबा दिला. या सभेला गर्दी करण्याचं आश्वासनही दिलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सभेसाठी छत्रपती संभाजी शहरात वाहतुकीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. दुपारनंतर शहरातील तीन मोठे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मिल कॉर्नर ते खडकेश्वर, खडकेश्वर ते भडकल गेट आणि भडकल गेट ते पोस्ट ऑफिस असे तीन रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
सभेला येणाऱ्यासाठी कर्णपुरा मैदानावर पार्किंची व्यवस्था करण्यात आली आहे. सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांसाठी हर्सूल सावंगी रस्त्यावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सिल्लोड फुलंब्रीवरून येणाऱ्यांना केम्ब्रिज चौक जालना रोड मार्गे कर्णपुरा मैदानावर येणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आज दुपारी 3.15 वाजता खाजगी विमानाने कलीना येथून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने रवाना
दुपारी 4.15 वाजता छत्रपती संभाजी नगर विमानतळ येथे आगमन
सायंकाळी 6.45 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ग्राउंडच्या दिशेने रवाना
सायंकाळी 7 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ग्राउंड येथे आगमन
रात्री 9 वाजता संभाजी नगर विमान तळाच्या दिशेने रवाना
रात्री 9.15 वाजता मुंबई च्या दिशेने रवाना