औरंगाबाद: पावसानं दडी मारल्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसानं शेतातील पिकं पिवळी पडली आहेत. बीड, औरंगाबाद,परभणी, जालना,लातूर, उस्मानाबाद, जालना,हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सततच्या पावसानं चिंता वाढली आहे.सततच्या पावसाने पिके पिवळी पडली आहेत. बीड, औरंगाबाद,परभणी, जालना,लातूर, उस्मानाबाद, जालना,हिंगोली,नांदेड जिल्ह्यात सातत्यानं पाऊस होत असल्यानं पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
कापूस, सोयाबीन सह कडधान्याची पिकं हातून जाण्याचा धोका
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने कापूस, सोयाबीन,तूर,मूग,उडीद,पिकांना धोका निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून सतत पाऊस होत असल्यानं शेताचे तळे झाले आहे. पाऊस असा कायम राहिल्यास आणि पिकांमध्ये पाणी साचल्यास पिकांचं मोठ्य़ा
महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतीच्या नुकसानाचे पंचनामेही 48 तासांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्याचे राज्याच्या कृषी विभागानं आदेश दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लवकरात लवकर पंचनामे करुन भरपाई निश्चित करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबीमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.
इतर बातम्या:
कृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले?
Maharashtra rain update due to heavy rainfall effected crops in districts of Marathwada