औरंगाबाद : महाराष्ट्रात सध्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मराठवाड्याला गुलाब चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय तर 13 जणांच्या मृत्यू झाली आहे. राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा सुरु आहेत. औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यामुळे 215 विद्यार्थी एव्हरेस्ट मधील CET परीक्षेला मुकले असल्याचं समोर आलं होतं. पुलावरून पाणी वाहत असल्याने औरंगबाद शहरासह परराज्यातील विद्यार्थी मुकले परीक्षेला होते. रस्ता नसल्याने बराच वेळ विद्यार्थी रस्ता सुरळीत होण्याची वाट पाहत होते. मुसळधार पावसामुळे पोहचू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तातडीनं दखल घेत एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. पावसामुळं वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील, असं उदय सामंत यांनी जाहीर केल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. टीव्ही 9 मराठीनं यांसदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2021
या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.
इतर बातम्या :
MHT CET Exam Schedule : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
MHT CET exam Aurangabad student fail to attend exam due to flood Uday Samant said exam conduct again