छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात तुफान राडा झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संभाजीनगरमध्ये वातावरण तणावपूर्ण होते. दगडफेक झाल्याने काही जण या राड्यात गंभीर जखमीही झाले आहे. तर दुसरीकडे कालच्या राड्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. संभाजीनगरमध्ये वाद चिघळल्यानंतर 20 वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे आता या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर दुसरीकडे आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या राड्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादावरून कालीचरण महाराज यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळेही आता या वादाला आता नवे वळण लागण्याची शक्यता लागली आहे.
समाजात होणाऱ्या ज्या दंगली आहेत. त्या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप कालीचरण यांच्याकडून केला गेला आहे. त्यावरून इम्तियाज जलील यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या प्रकरणावरून टीका करताना त्यांनी या राड्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र ही चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मगाणीही खासदार जलील यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी नगरात दंगल झाली त्या दिवशी अनेक नेते दारू पिऊन घरात झोपले होते अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता जलील यांच्या टीकेनंतर राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
समाजात होणाऱ्या ज्या दंगली घडतात, त्या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात आहेत असा गंभीर वक्तव्य कालीचरण यांच्याकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूरात बोलताना त्यांनी समाजात घडणाऱ्या या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर बोलताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, कालीचरणसारखे लोक हे चोर लफंगेसारखे असतात.
त्यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या प्रकारची काही वादग्रस्त वक्तव्य करणारी लोकं काही दिवसानंतर हे सगळे लोक जेलमध्ये असतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.