क्रीडा विद्यापीठावरुन एमआयएम आक्रमक, खेळाडूंसह कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

| Updated on: Jul 28, 2021 | 4:44 PM

मराठवाड्याचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरित केल्याप्रकरणी खेळाडू आणि MIM आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद येथे होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.

क्रीडा विद्यापीठावरुन एमआयएम आक्रमक, खेळाडूंसह कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
imtiaz-jaleel
Follow us on

औरंगाबाद : मराठवाड्याचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरित केल्याप्रकरणी खेळाडू आणि MIM आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद येथे होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. याच मुद्द्याला घेऊन एमआयएमने औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलनादरम्यान एमआयएमचे नेते कार्यकर्ते तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. (MIM protested in front of Aurangabad district collector office for sport university)

औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याचा आरोप

देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात येत आहे. त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातील पुण्यातून रोवण्यात आली आहे. हे क्रीडा विद्यापीठ सुरुवातीला औरंगाबाद येथे सुरु करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, विद्यमान सरकारने हे विद्यापीठ पुणे येथे हलवले. त्यानंतर आता हाच मुद्दा घेऊन एमआयएम आक्रमक झाली आहे. एमआयएमने याच मुद्द्यावरुन आज (28 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न बाळगणारे खेळाडू हजर होते.

मराठवाड्यातील खेळाडूंचे नुकसान, एमआयएमचा आरोप

यावेळी बोलताना एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले. मराठवाड्यातील खेळाडूंच्या विकासासाठी हे विद्यापीठ महत्त्वाचे मानले जात होते. मराठवाड्यातील खेळाडूंचे नुकसान होत आहे, असे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

आंदोलनात एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

दरम्यान, एमआयएमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात सर्व पक्षांनी सामील व्हावे, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. या आंदोलनामध्ये खेळाडू तसेच एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जनआंदोलन करण्यात आले.

इतर बातम्या :

शेततळ्यात दोघे पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृ्त्यू, औरंगाबाद हळहळलं

राज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू; राजेश टोपेंच्या हस्ते लोकार्पण

बार्शीत आमदाराच्या दोन्ही मुलांचं धडाक्यात लग्न, चंद्रकांत पाटलांसह आमदार-खासदारांची हजेरी, कोरोना नियम धाब्यावर

(MIM protested in front of Aurangabad district collector office for sport university)