औरंगाबाद : मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यात अक्षरश: हाहा:कार माजवला. औरंगाबादेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandeep Bhumr) यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची तसेच पिकाची पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे त्यांनी आश्वासन दिले. (minister Sandeep Bhumre inspected heavy rain affected areas and farms of aurangabad)
संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद आणि पैठण तालुक्यात अृतिवृष्टीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते. भुमरे आणि चव्हाण यांनी औरंगाबाद आणि पैठण तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेट दिली. तसेच प्रत्यक्ष जाऊन पावसाची तीव्रता तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानीची पाहणी करताना भुमरे यांच्यासोबत स्थानिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाचे किती नुकसान झाले याची माहिती भुमरे यांना दिली. नंतर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासनही भुमरे यांनी दिले.
औरंगाबादेत 07 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र संध्याकाळी 7.10 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पुढच्या दोन-तीन मिनिटात म्हणजेच 7.12 मिनिटातच पावसानं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यानंतर आकाशात विजांचा कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शहर आणि परिसरात पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. पुढे 8.15 म्हणजेच सव्वा आठच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला. या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरत तसेच जिल्ह्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंजना-पळशी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. परिणामी अंजना नदीला पूर आला. ही नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दहा गावांचा संपर्क तुटला. सोमवारी रात्रीपासून पिशोरला मुसळधार पाऊस होत असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने गावांतील नागरिकांचे खूप हाल झाल्याचे वृत्त दै. लोकमध्ये प्रकाशित झाले आहे. या परिसरातील भारंबा, भारंबा तांडा, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, कोळंबी, जैतखेडा, साळेगाव, साळेगाव तांडा, पळशी बु., पळशी खुर्द आदी गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे.
इतर बातम्या :
Aurangabad Festival: बाजारात पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केलेल्या मखरांची आवक, गणेशभक्तांमध्ये उत्साह
आधी फडणवीस, आता शेलारांकडून राणेंच्या विधानापासून फारकत; शेलार म्हणाले, विमानतळाच्या उद्घाटनला मुख्यमंत्र्यांनी यावंhttps://t.co/ADVEUmD97G#ashishshelar | #bjp | #NarayanRane | #Devendrafadnavis | #CMUddhavThackeray | #chipi
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2021
(minister Sandeep Bhumre inspected heavy rain affected areas and farms of aurangabad)