औरंगाबाद : शिवसेना (ShivSena) आमदार रमेश बोरणारे (Ramesh Boranare) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या (BJP) कार्यक्रमात का गेलात म्हणत रमेश बोरणारे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या भावजयीने केला होता. दरम्यान आता याच महिलेने गृहमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. शिवसेना आमदार रमेश बोरणारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असून, आपण त्रासाला कंटाळलो आहोत. मला आत्महत्येची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे असे या प्रकरणात आरोप करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांनी हे पत्र वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान यापूर्वी देखील एकदा जयश्री बोरणारे यांनी रमेश बोरणारे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. आपण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने रमेश बोरनारे यांनी त्याचा राग मनात धरत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणानंतर राजकारण चांगलेच तापले होते.
शिवसेना आमदार रमेश बोरणारे हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या चुलत भावाच्या पत्नीने रमेश बोरणारे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्या केवळ आरोप करूनच थांबल्या नाहीत तर त्यांनी गृहमंत्र्यांकडे थेट आत्महत्येची परवानगी मागितली आहे. त्यांनी या प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे असे या महिलेचे नाव आहे. त्या गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणातात की, शिवसेना आमदार रमेश बोरणारे हे मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत. मी त्रासाला कंटाळले असून, मला आत्महत्येची परवानगी देण्यात यावी. त्यांनी हे पत्र वैजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे.
दरम्यान ही घटना पहिल्यांदाच घडत नाहीये, तर यापूर्वी देखील जयश्री बोरणारे यांनी रमेश बोरणारे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आपण आपल्या पतीसोबत सहभागी झालो होतो. दरम्यान या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा राग मनात धरून, बोरणारे यांच्यासह दहा जणांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यावेळी जयश्री बोरणारे यांनी केला होता. यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी बोरणारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.