औरंगाबाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला अवघा एक दिवस बाकी असताना मनसेकडून (mns) एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ शेअर करत उद्याच्या सभेत काय होईल याची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे उद्याची सभा दणक्यात आणि खणखणीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याशिवाय मनसे भोंग्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचंही या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. 12 एप्रिल ते 3 मेपर्यंत सर्व मौलवींना बोलावून घ्या. त्यांना सांगा सर्व मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजेत, हे त्यांना सांगा. 3 तारखेनंतर आमचा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असं राज ठाकरे या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राज यांच्या ठाण्यातील सभेचा आहे. याच सभेत त्यांनी सरकारला डेडलाईन दिली होती. त्यानंतरही राज्यातील भोंगे (loudspeaker) उतरलेले नाहीत. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा हा व्हिडीओ शेअर करून राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. मनसेच्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्विट रिट्विट करण्यात आलं आहे. राजसाहेबांच्या आवाहनाचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करू इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे लक्ष न देता, मुस्लिम बांधवांनी संपूर्ण समाजाचा योग्य विचार करावा. या राजकारणाला बळी पडू नये. कारण, आपल्याला धार्मिक तेढ नकोय सामाजिक सलोखा हवाय, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
या व्हिडीओत राज ठाकरे यांचं ठाण्यातील सभेतील भाषणाचा थोडा भाग आहे. त्यानंतर पब्लिक कमेंट आहेत. अलहाबाद कोर्टाने भोंग्यांविषयी नेमकं काय म्हटलं आहे, याची माहिती आहे. तसेच सौदी अरेबियात काय निर्णय झाला त्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर निवेदक भोंग्यांवरून पुन्हा एकदा मुस्लिमांना आवाहन करताना दिसत आहे. 12 एप्रिल ते 3 मेपर्यंत सर्व मौलवींना बोलावून घ्या. त्यांना सांगा सर्व मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजेत, हे त्यांना सांगा. 3 तारखेनंतर आमचा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असं राज ठाकरे या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये काही लोकांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. लाऊडस्पीकरमुळे त्रास होतोय. आवाजाचं प्रदूषणावर नियंत्रण असावं. आवाज कमी असला पाहिजे, असं लोक म्हणताना दिसत आहेत.
अजान इस्लामचं अविभाज्य अंग असू शकतं. पण लाऊडस्पीकरचा इस्लामशी संबंध नाही, असं अलाबाद कोर्टाने म्हटल्याचं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. सौदी अरेबियात मशिदीत लाऊडस्पीकर बंदी घातली. लोकांच्यासाठी निर्णय. त्यांना झोप मिळावी म्हणून हा निर्णय घेतल्याचं सौदी प्रशासनाने म्हटलं होतं, असा दाखलाही देण्यात आला आहे.
या व्हिडीओच्या शेवटी निवेदकाचं एक निवेदन आहे. भोंग्यांचा शोध लागण्याआधीपासून अजान पढली जाते. तेव्हा लाऊडस्पीकर नव्हते ना. सण उत्सावात लाऊडस्पीकर लावणं समजू शकतो. पण रोजच भोंग्यांवर अजान लावली पाहिजे असं कुराणात कुठं म्हटलं आहे? या तंत्रज्ञानाचा वापर करून भोंगा स्वीकारला, आता त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून भोंगे हटवा. भोंग्यांना पर्याय म्हणून अॅप वापरा. अबालवृद्धांना त्रास देणारी भोंग्यांची भणभण नकोय. सामाजिक सलोखा हवाय. कुणालाच कुणाचा त्रास नकोय, असं आवाहन निवेदक करताना दिसत आहे.
राजसाहेबांच्या आवाहनाचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करू इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे लक्ष न देता, मुस्लिम बांधवांनी संपूर्ण समाजाचा योग्य विचार करावा आणि ह्या राजकारणाला बळी पडू नये. कारण, आपल्याला धार्मिक तेढ नकोय सामाजिक सलोखा हवाय !#MNS pic.twitter.com/grJWH7bADP
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 29, 2022