औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील (Aurangabad) मुख्य आणि ऐतिहासिक बाजारपेठ (Market)समजल्या जाणाऱ्या गुलमंडी भागात आज अचानक वानरांच्या (monkey)टोळीने धुमाकूळ घातला. संक्रांती निमित्त बाजारपेठ गर्दीने भरलेली असताना वानरांच्या टोळक्याने विक्रीसाठी आणलेले मका, केळी, हुरडा अश्या खाद्य पदार्थवार हल्ला चढवीत ते फस्त केले. बाजारपेठेतील लीला मार्केट काल खूपवेळ सुरु होतं. बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांच्या गाड्यांचं सुध्दा मोठं नुकसान केलं आहे. विशेष म्हणजे काल बाजारात माकडं बिनधास्त फिरत होती, त्यातबरोबर लोकं सुध्दा त्यांना खायला देत असल्याचं चित्र व्हिडीओत पाहायला दिसतंय.
औरंगाबाद शहरात मंकरसंक्रातीच्या निमित्ताने बाजारात मका, केळी, हुरडा, कणसं अशा अनेक गोष्टी विक्रीसाठी आल्या होत्या. हे सगळं पाहिल्यावर माकडांनी बाजारातील अनेक गोष्टी हुसकवायला सुरुवात केली. त्याचबरोबर कालची बाजारपेठ सुध्दा चांगलीचं भरली होती. शहरातील अनेक लोकांनी काल अधिक खरेदी केली.