औरंगाबाद : लस उपलब्ध नसल्यामुळे औरंगाबाद शहरात बहुतांश लसीकरण केंद्रे बंद आहेत. शहरात आज (8 ऑगस्ट) फक्त तीन लसीकरण केंद्रांवर कोव्हक्सिन लस उपलब्ध झाली. लस उपलब्ध नसल्यामुळे औरंगाबादेत जवळपास 45 हजारपेक्षा जास्त नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. (more than 45 thousand people are waiting for their second dose of Corona vaccine in Aurangabad)
45 हजार पेक्षा जास्त नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
औंरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. लसीकरण केंद्रांवर लसीसाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. आजसुद्धा (8 ऑगस्ट) शहरातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद होते. एकूण फक्त 3 लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होती. लस उपलब्ध होत नसल्यामुळे येथे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शहरात जवळपास 45 हजार पेक्षा जास्त नागरिक कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व नागरिकांचे 84 दिवस उलटून गेले आहेत. आम्हाला लवकरात लवकर लस दिली जावी अशी मागणी या नागरिकांकडून होत आहे.
तर दुसरीकडे लसींचा अपूर्ण साठा प्राप्त होत असल्याने लसीकरणात मोठा खंड पडत. राज्य सरकारकडून मनपाला वेळेवर लसी प्राप्त होत नाहीत. लससाठा उपलब्ध झाला तर थेट सोमवारीच लसीकरण केंद्रे सुरु होणार आहेत. मनपा प्रशासनाने तशी माहिती दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाला थोपवायचे असेल तर कोरोना प्रतिंबधक लस हा एक नामी उपाय असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. याच कारणामुळे लसीकरणापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनपाने औरंगाबाद शहरात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिव्यांग, दुर्धर आजार असलेले आणि बेडवरून उठू न शकणाऱ्या रुग्णांना कोरोना लस दिली जाणार आहे. त्यासाठीची पहिली तयारी म्हणून दिव्यांग तसेच आजारी रुग्णांचा मनपा शोध घेत आहे. त्यासाठी मनपाने सर्वेक्षण सुरू केले आहे.
इतर बातम्या :
सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राचा देशभरातून गौरव, इंडिगो फ्लाईट कंपनीचं खास गिफ्ट
औरंगाबाद मनपाचा मोठा निर्णय, आता आरोग्य पथक घरोघरी जाऊन लसीकरण करणार
Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
(more than 45 thousand people are waiting for their second dose of Corona vaccine in Aurangabad)