औरंगाबादः महावितरणाच्या दुर्लक्षामुळे गंगापूर तालुक्यातील रायपूरमध्ये महावितरणच्या (MSEDCL) वीज वितरणाचे तीन-तेरा उडाले आहेत. परिसरात वीज (Electricity) वितरण वेळेत आणि योग्य होत नसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. महावितरणाच्या या भोंगळ कारभारामुळेच आणि त्यांच्या कारभाराला वैतागून रायपूरच्या महिला सरपंच यांचे पती गणेश देशमुख यांनी डिपीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन (Sholy Style agitation ) सुरू केले. या आंदोलनानंतर महावितरणाचे कर्मचारी घटनास्थली दाखल झाले मात्र त्यांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल विचारपूस करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर आणि तेथील नागरिकांवर अरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
रायपूरच्या महिला सरपंच यांचे पती गणेश देशमुख यांनी महावितरणाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी डीपीवर चढून आंदोलन केले. त्यानंतर महावितरणचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र यावेळी आंदोलन मागे घ्या सांगण्याऐवजी त्यांच्याकडून आंदोलन करणाऱ्यांवर आणि नागरिकांवर अरेरावीची भाषा करण्यात येत होती. महावितरणाच्या कारभारामुळे ग्रामस्थांना वीज पुरवठा योग्य रित्या होत नाही. वीज वितरण करण्यात येत असले तरी नेहमी वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो, याबाबत महावितरणकडे अनेकदा तक्रारही करण्यात आली, निवेदने देण्यात आली तरी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे महिला सरपंचाचे पती गणेश देशमुख यांनी डीपीवर चढून आंदोलन केले.
महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण परिसरातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. महावितरणकडून कधीही वेळेवर वीज नसते, दिवसातून अनेकदा वेळा वीज प्रवाह खंडित केलेला असतो, त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे गणेश देशमुख यांनी डीपी चढून आंदोलन केले. त्यांनी डीपीवर चढून आंदोलन केल्यानंतर महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, यावेळी त्यांनी त्यांची समजूत काढण्याऐवजी आंदोलकर्त्यांवर अरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली. यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली.
संबंधित बातम्या
Nanded | ….तर आमदारकी सोडेन! आमदार Prashant Bamb यांचं बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना ओपन चॅलेंज!