Osmanabad | नॉट रिचेबल किरीट सोमय्यांविरोधात उस्मानाबादेत पोस्टरबाजी, शोधणाऱ्यांना बक्षीस जाहीर

| Updated on: Apr 13, 2022 | 10:26 AM

हे पोस्टर्स देशप्रेमी संघटना धाराशिव तर्फे असल्याचे मजकूरावरून कळतेय. मात्र उस्मानाबादेत अशा प्रकारची कोणतीही संघटना नोंदणीकृत नसल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तरीही काही अज्ञात तरुणांनी हे पोस्टर्स लावल्याचे सांगण्यात आले आहे.

Osmanabad | नॉट रिचेबल किरीट सोमय्यांविरोधात उस्मानाबादेत पोस्टरबाजी, शोधणाऱ्यांना बक्षीस जाहीर
उस्मानाबादेत किरीट सोमय्यांविरोधात पोस्टरबाजी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उस्मानाबाद | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळ्यातील आरोपी, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि त्यांचा मुलगा नील हे मोस्ट वाँटेड असून त्यांना शोधणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल, अशा आशयाचे पोस्टर्स उस्मानाबाद (Osmanabad) शहरात लावण्यात आले आहेत. देशप्रेमी संघटना धाराशिवय या नावाने उस्मानाबाद शहरात अनेक ठिाकणी ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे संवर्धन करण्यासाठी जमा केलेला 58 कोटी रुपयांचा निधी स्वतःच्याच घशात घातल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. सोमय्या आणि त्यांचा मुलगा यांनी स्वतःचे उद्योग आणि राजकाराणासाठी जनतेकडून मिळवलेला हा पैसा वापरल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांना या प्रकरणी समन्य बजावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी जामीन अर्जासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. आता याविरोधात ते उच्च न्यायालयात जाणार आहेत.

उस्मानाबादेत जागोजागी पोस्टर्स

उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. विक्रांत युद्धनौकेप्रकरणी फरार आरोपी असलेल्या किरीट सोमय्यांचा या पोस्टर्सवर मोस्ट वाँटेड असा उल्लेख केला आहे. हे पोस्टर्स देशप्रेमी संघटना धाराशिव तर्फे असल्याचे मजकूरावरून कळतेय. मात्र उस्मानाबादेत अशा प्रकारची कोणतीही संघटना नोंदणीकृत नसल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तरीही काही अज्ञात तरुणांनी हे पोस्टर्स लावल्याचे सांगण्यात आले आहे.

किरीट सोमय्यांचा जामीन फेटाळला

आयएनएस विक्रांत हे जहाज भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेतून 2013-14 मध्ये मोठा निधी गोळा केला होता. हा जवळपास 58 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केलाच नाही, असे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. राज्यपालांनी तसे पत्रही दिले आहे. याच आधारे संजय राऊत यांनी हा घोटाळा उघड केला. त्यानंतर किरीट सोमय्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल होते. काल 12 एप्रिल रोजी त्यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ प्रसारीत करत आपला जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला असून आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं.

इतर बातम्या-

Raj Thackeray Uttar Sabha Thane: 12 ते 3 मे, राज ठाकरेंची सरकारला भोंगे उतरवण्यासाठी डेडलाईन, सुप्रीम कोर्टाची टिप्पणीही भरसभेत वाचून दाखवली का?

Hair Care : उन्हाळ्यात केसांची चमक टिकवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले हे पदार्थ केसांना लावा!