उस्मानाबादः सक्षणा सलगर (Sakshana Sangar) यांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडल्याची टीका राष्ट्रवादीच्या माजी युवती जिल्हाध्यक्ष देवकन्या गाडे यांनी केला आहे. सक्षणा या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हा परिषद (Osmanabad ZP) सदस्य आहेत. तर देवकन्या गाडे (Devkanya Gade) यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेतही सक्षणा सलगर यांच्या आक्रमकतेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सक्षणा सलगर यांनी आमदार भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्यावर भर सभेत आरोप केले. सत्तेचा रिमोट कंट्रोल कुणाकडे आहे? विकास कामे झाली नाहीत असे आरोप केले. पाटील यांनी पदाचा दुरुपयोग केला तसेच वैयक्तिक कामे केली असा आरोप सलगर यांनी केला.
दरम्यानन सक्षणा सलगर यांच्या अशा प्रकारे आरोपांनतर त्यांच्यावर पाटील समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सक्षणा सलगर यांच्या जाचला कंटाळून राष्ट्रवादी युवती सोडल्याचा आरोप माजी युवती जिल्हाध्यक्ष देवकन्या गाडे यांनी केला आहे. पाटील कुटुंबाच्या जीवावर मोठ्या झालात आणि त्यांच्याबाबत बोलताना तारतम्य ठेवा, चुकीचे आरोप करू नका, अन्यथा आपण कसा त्रास देता याची पोलखोल करू असा इशारा गाडे यांनी दिला आहे.
सक्षणा सलगर यांनी जिल्हा परिषद सभेत पाटील कुटुंबाला टार्गेट करित गोंधळ घातल्यामुळे सहकारी पक्षाच्या अनेक सदस्यांनी त्यांचे भर सभेत कान टोचले. यापूर्वी अजित पवार यांनी भर सभेत सक्षणा सलगर यांना सुनावले होते. भाषा सभ्य ठेवा व बोलताना तारतम्य बाळगा, असे सांगत पवार यांनी सलगर यांच्यावर भाष्य केले होते. सक्षणा सलगर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच नरेंद्र मोदी यांचाही एकेरी उल्लेख केला होता.
इतर बातम्या-