औरंगाबाद: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर चांगली गोष्ट आहे. आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
औरंगाबादमध्ये ओबीसींच्या विभागीय मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणताच एकच खसखस पिकली.
तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी ओबीसी मेळाव्याला संबोधित करताना राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वंचित आणि पीडीतांना लाभ मिळावा म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. त्यामुळे अनेक मंत्री झाले. सरकार आलं आणि गेलं पण समाजाला न्याय मिळत नाही. माझं वय 42 वर्ष आहे. 42 वर्ष झालं तरी माझा संघर्ष सुरू आहे, असं सांगतानाच ओबीसींना आरक्षण द्या. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवू नका, नाहीतर तुम्हाला बाहेर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं. तुम्ही जो ओबीसींसाठीचा अध्यादेश काढला आहे. तो टिकवून दाखवा. तुम्ही हा अध्यादेश टिकवून दाखवला तर आम्ही तुमचं कौतुकच करू, असंही त्या म्हणाल्या. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
या आरक्षणाचं भवितव्य काय आहे? या निवडणुकीत ओबीसींच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्याचं काम सुरू केलं आहे. एखादा व्यक्ती ओपनच्या जागेवर निवडून येईल. पण त्याला मोक्याच्या ठिकाणी संधी मिळणार आहे का? आमची राजकीय आरक्षणाची मागणी नाही. तर शिक्षण आणि नोकऱ्यांच्या आरक्षणाची मागणी आहे. पण आता आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षणासह राजकीय आरक्षणही मागणारच आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 October 2021 https://t.co/8TKsCpXHvy #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’
अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली! राज्य सरकारचं दुर्लक्ष, भाजपचा आरोप
(pankaja munde reaction on devendra fadnavis statement over CM post)