औरंगाबादः जायकवाडी धरणातून वाळूज एमआयडीसीला (Waluj MIDC) पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन फुटल्याने मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जायकवाडी धरणातून निघालेल्या प्रमुख लाईनमध्येच हा बिघाड झाला. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाईपलाइनमधून बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकदेखील ठप्प झाली होती. शेंदूरवडा गावाजवळ ही पाइपलाइन फुटल्याची माहिती हाती आली आहे.
धरणातून वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी प्रमुख पाईप लाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी मोठ्या दाबाने रस्त्यावर आले. या पाण्याच्या प्रेशरमुळे वाळूज-पाटोदा- औरंगाबाद रस्ता खचला. या खचलेल्या रस्त्यात एक मालवाहू ट्रक अडकला. त्यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
इतर बातम्या-