औरंगाबादः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने भाजपकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. त्यामुळे आता शिवप्रेमी संघटनेसह राज्यातील संघटना आक्रमक झाल्या आहेत. आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल आणि आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चातर्फे विनोद पाटील यांनी राज्यपालांची जोपर्यंत हाकालपट्टी होत नाही तोपर्यंत आमचा निषेध सप्ताह सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे वाचाळवीरांविरोधात आता आक्रमक होत जोरदार निदर्शनं करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी टीका केली.
त्यानंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल विनोद पाटील यांनी केला आहे.
प्रसाद लाड यांना दोनवेळा आमदाराकी मिळाली आहे. त्यामुळे ते जास्त बोलत आसतील असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे.
शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यार टीका करताना विनोद पाटील म्हणाले की, त्यांनी परत पहिलीत प्रवेश घेऊन शिवाजी महाराजांचा इतीहास शिकुन घ्यावा अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.
तसेच ते मोनोरुग्न आहेत त्यामुळे त्यांना जास्त महत्व द्यायची गरज नाही असंही मत त्यांच्याविषयी व्यक्त करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आमदार संजय गायकवाड, आणि आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता मराठी क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे औरंगाबादमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व भगिनींनी अतुल सावे यांना सवाल केला आहे.
आणि त्यांनी आंदोलनानंतर आमच्या भावना समजून घेतल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपमान कोणीही सहन करणार नाही आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठी क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे.