सरकारला पाझर नव्हे घाम फोडा, ‘शिवसेना’ तुमच्यासोबत आहे, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 23, 2022 | 3:51 PM

सरकारला घाम फोडला पाहिजे. त्या कामात शिवसेना तुमच्या सोबत आहे.

सरकारला पाझर नव्हे घाम फोडा, शिवसेना तुमच्यासोबत आहे, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Follow us on

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या नुकसानीचा आढावा घेतला. अब्दुल सत्तार हे कृषिमंत्री आहेत. त्यामुळं ठाकरे यांनी हा भाग दौऱ्यासाठी निवडला असावा. यावेळी ठाकरे यांनी पेंडापूर येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही पंचनामे करणार. त्यानंतर मदत देणार. तोपर्यंत शेतकऱ्यांचं आयुष्य बरबाद होते. कारण हा सीजन गेला. हा हंगाम संपला. आता दिवाळी साजरी करू किंवा करू नका, असं काही सरकारला सांगायचं आहे का?

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, संकट येत असतात. शेतकरी म्हणून एक व्हा. आसूड घेऊन आले. तो माझ्याकडं नाही. तुमच्याकडं ठेवला पाहिजे. तो आसूड तुम्ही वापरत नाही. तो वापरा आता. शेतकऱ्यांच्या हातातच आसूड शोधून दिसतो. उगाच आम्ही घ्यायचा नि फॅशन म्हणून फोटो काढायची नाही शोभत. हा तुमचा अधिकार आहे. मातीला कोंब फोडता. मग, सरकारला पाझर का फोडू शकत नाही. दगडाला पाजर फुटतो म्हणतात. तसा सरकारला पाजर फोडा.सरकारला घाम फोडला पाहिजे. त्या कामात शिवसेना तुमच्या सोबत आहे.

ज्यानं घरात सगळकाही देऊन घर सोडून फिरताहेत त्यांना शेतकऱ्याचं दुःख काय आहे, ते कसं कळणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. म्हणूनचं म्हटलं शेतकऱ्याकडं आसूड आहे. पण, बळीराजाशी गद्दारी करणारं सरकार आहे. दिसूनही डोळेझाक करत आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं सरकार असताना आम्ही वाढवून मदत केली होती. दोन-तीन नीती आयोगाच्या बैठकी झाल्या होत्या. मी माझ्या घरी, पंतप्रधान त्यांच्या घरी अशी बैठक झाली होती. मी आणि पंतप्रधानांनी घरात बसूनच काम केलं. त्यावेळीसुद्धा एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली, असंही त्यांनी सांगितलं.

नीती आयोगाच्या बैठकीत मागणी केली होती. मदत वाढवून मिळाली पाहिजे. पीक विमा यासाठी बीड पॅटर्न काय आहे. काय मान्य करावं हे कळला पाहिजे. मला त्यांची किव येते. स्वतः सत्तेसाठी आंधळेपणानं वागताहेत. आसुरी महत्त्वाकांक्षा असते. त्यातून सत्तांतर केलंय. पण, अन्नदात्याशी गद्दारी करू नका. स्वतःच घर सोडून फिरणाऱ्यांनी माझ्यावर टीका करू नये, असा सज्जड दमही त्यांनी दिला.