औरंगाबाद : या राज्यात देशात अनेक आंदोलनं झाली. सत्ताधाऱ्यांनी चर्चा केल्या. कुणाच्याही घरावर जाणं ठीक नाही. हनुमान चालीसा करण्यासाठी कुणी जात असेल, तर सरकारच्या लोकांनी पोलिसांनी समजूत काढली पाहिजे. पण शिवसैनिकांना (Shiv Sena) पाठवून त्यांना धमकावणं, हे चुकीचं. लोकशाहीला न शोभणार आहे. विरोधकांची मुस्कटदाबी करणं, यामुळे हे केलं जातंय. हे केवळं आणीबाणीच्या काळातच झालं होतं. पण आणीबाणीनंतर काँग्रेसचं वटवृक्षासारखं असलेला सरकार लोकांना मुळासकट उपटून काढलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचंही तेच होणार आहे. जनता यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री (Union Minister) रावसाहेब दानवे यांनी दिलाय.
रावसाहेब दानवे म्हणाले, पोलिसांना पुढं करून राजकारण करण्याचा धंदा सुरू केलाय. पोलिसांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. त्यांनी मातोश्रीवर जायला हवं, या मताचे आम्ही नाही. पण सरकारच्या प्रतिनिधींनी जायला हवं, त्यांची समजून काढायला हवी होती. अण्णांची जशी सरकारनं समजून काढली होती, तशी समजून काढता आली असती. पण गुंडगिरी करुन त्यांचा डाव हाणून पाडलं, महाराष्ट्राला शोभनीय नाही.
रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांच्या विश्वासाहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरीट सोमय्या यांच्या ड्राईव्हरगुन्हा दाखल झाला. मात्र शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला नाही. बॉम्बस्फोटावेळी महाराष्ट्रात जेवढी परिस्थिती खराब झाली नव्हती तेवढी परिस्थिती आज खराब झाली आहे. राणा कुटुंबाच्या घराबाहेर असलेले शिवसैनिक पोलिसांनी हटवले नाहीत. आंदोलकांशी सरकारचे प्रतिनिधी जाऊन चर्चा करतात. पण राणा दाम्पत्यांशी चर्चा केली नाही. उलट शिवसैनिक पाठवून दबाव निर्माण केला जात आहे. राणा दाम्पत्याना अटक केली जाते.
या राज्यात लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू आहे. राणा दाम्पत्य हे शांततेच्या मार्गानं हनुमान चालीका म्हणणार होते. अशावेळी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. दबावाला ते बळी पडले नाहीत. म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. अमरावती आणि मुंबई येथील राणा दाम्पत्याच्या घरावर आंदोलन करण्यात आले. हे योग्य नव्हे. गुन्हे खऱ्या अर्थानं आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर लावायला पाहिजे होते. पण, तसं झालं नाही. उलट राणा दाम्पत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले.