Raj Thackeray : ज्यादिवशी शिवाजी नावाचं भूत अंगात येईल ना, राज ठाकरेंच्या भात्यात बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य

| Updated on: May 01, 2022 | 9:38 PM

नरहर कुरुंदकर यांच्या ग्रंथाचा दाखला देत त्यांनी शिवाजी महाराज कोण होते, त्यांच्याविषयी काय विचार करतो याविषयीही त्यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या पत्रांचा इतिहास सांगत त्यांनी औरंगाजेबाच्या पत्रांचाही इतिहास सांगितला. जी पत्रं पाठवली त्यात तो कुणाचा उल्लेख करत नाही. तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतो.

Raj Thackeray : ज्यादिवशी शिवाजी नावाचं भूत अंगात येईल ना, राज ठाकरेंच्या भात्यात बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य
राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा
Image Credit source: TV9
Follow us on

औरंगाबादः औरंगाबादमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र समजून घेण्याचा कानमंत्र देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत त्यांनी इतिहास समजून घेणं महत्वाचं असल्याचं सांगितले. या सभेत होत असलेला गोंधळ बघून त्यांनी सज्जड दम देत कोणी टाळकी गडबड करायला आली तर तिथल्या तिथं हाणा असा दमही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी दंगा करणाऱ्यांना सांगितले की, चौरंग करुन घरी पाठवीन असा दम देत त्यांनी पुन्हा शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या इतिहास सांगितला.

बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य

या सभेत राज ठाकरे यांनी इतिहासातील शिवाजी महाराज, अल्लाउद्दीन खिलजी, देवगिरीचा किल्ला, पैठण याचा संदर्भ देत त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीने आपण एक लाख सैनिक घेऊन येणार ही कशी फेक न्यूज होती तेही त्यांनी यावेळी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा दाखला देत सांगितले की, बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य सांगत ते म्हणाले की, आमच्या लोकांच्या अंगात देवी आणि भुतं येतात, सर्व येतं. यावर बाबासाहेब म्हणतात की, ज्या दिवशी या लोकांच्या अंगात शिवाजी येईला तेव्हा अख्ख जग पदाक्रांत करू, आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे. ही आमची मराठेशाही आहे, हा आमचा महाराष्ट्र म्हणत त्यांनी आजच्या आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचाही दाखला दिला.

आमच्या किल्ल्यात फितूरी

त्यावेळी अल्लाउद्दीन खिलजीने एक लाख लोकं घेऊन येतो म्हणून सांगितलं मात्र त्यावेळी आमच्या किल्ल्यात फितूरी झाली. त्यावेळी खिलजीचं एक लाख लोकं नव्हती, हा इतिहास वाचतो तेव्हा कळतं असंही त्यांनी सांगितले. अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येतं ही महाराष्ट्रीातली पहिली फेक न्यूज असल्याचे त्यांनी सांगत ही फेक न्यूज आपण सोशल मीडियावर येतात असं सांगत त्यांनी धार्मिक आणि जातीय राजकारणावर त्यांनी जोरदार हल्ला केला

हे सुद्धा वाचा

चारशे वर्ष महाराष्ट्र खितपत राहिला

इतिहासातील काही चुकांमुळे महाराष्ट्रात अंधकार राहिला. त्यामुळे पुढचे चारशे वर्ष महाराष्ट्र खितपत राहिला. या महाराष्ट्रातील माता भगिनींवर अत्याचार होत होते. बलात्कार होत होते, मंदिरं पाडली जात होती, याच पैठणमध्ये आमच्या एकनाथ महाराजांनी आरोळी दिली दार उघड बये दार उघड या गोष्टी सांगत त्यांनी हे आता पाहवत नसल्याचे सांगितले, मात्र 1630 ला दार उघडलं असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी छत्रपतींचा जन्म झाला, त्यावेळी स्वाभिमानाने कसं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने आम्हाला शिवकवले असल्याचे सांगितले.

शिवाजी महाराज मला छळतो

यावेळी त्यांनी नरहर कुरुंदकर यांच्या ग्रंथाचा दाखला देत त्यांनी शिवाजी महाराज कोण होते, त्यांच्याविषयी काय विचार करतो याविषयीही त्यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या पत्रांचा इतिहास सांगत त्यांनी औरंगाजेबाच्या पत्रांचाही इतिहास सांगितला. जी पत्रं पाठवली त्यात तो कुणाचा उल्लेख करत नाही. तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतो. त्यावेळी त्यामध्ये का लिहितो हे सांगत त्यांनी शिवाजी महाराज मला छळतो असा उल्लेख तो करतो.

मराठे शाहीचा इतिहास आपण विसरलो

मराठी शाहीने मोगल साम्राज्य उद्धवस्त केलं. पाकिस्तानातील अटोक किल्ला तिथे भगवी पताका फडकली. हा मराठे शाहीचा इतिहास आपण विसरलो असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही फक्त पुण्यतिथी आणि जयंती साजरी करतो महापुरुषांच्या असं म्हणून त्यांनी कार्यर्त्यांचे कानही टोचले. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य सांगत ते म्हणाले, की आमच्या लोकांच्या अंगात देवी आणि भुतं येतात. बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या लोकांच्या अंगात शिवाजी येईल तेव्हा अख्ख जग पदाक्रांत करू असं म्हणत त्यांनी आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे, ही आमची मराठेशाही आहे, हा आमचा महाराष्ट्र असल्याचे त्यांनी सांगितले.