आयकर विभागाचा धाक दाखवत मागितली 60 लाखांची खंडणी, व्हिडीओ समोर आल्याने औरंगाबादेत खळबळ

| Updated on: Aug 26, 2021 | 10:27 PM

औरंगाबादेत उद्योजकांना धमकावण्याचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सध्या एका उद्योजकाला आयकर विभागाचा धाक दाखवून 60 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भामट्यांनी खंडणी मागताच उद्योजकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे.

आयकर विभागाचा धाक दाखवत मागितली 60 लाखांची खंडणी, व्हिडीओ समोर आल्याने औरंगाबादेत खळबळ
AURANGABAD CRIME
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादेत उद्योजकांना धमकावण्याचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सध्या एका उद्योजकाला आयकर विभागाचा धाक दाखवून 60 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भामट्यांनी खंडणी मागताच उद्योजकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली असून सुशांत दत्तात्रय गिरी असे तक्रारदार उद्योजकाचे नाव आहे. या घटनेमुळे औरंगाबादेतील उद्योजक जगतात एकच खळबळ उडाली आहे. (ransom of 60 lakh rupees has been demanded to entrepreneurs in Aurangabad)

खंडणी मागतानाचा व्हिडीओ समोर

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमधील सुशांत गिरी या उद्योजकाला धमकावून तब्बल 60 लाख रुपये मागण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेची मागणी होताच या उद्योजकाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. आयकर विभागाचा धाक दाखवून हे पैसे मागण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गिरी यांना खंडणी मागतानाचा व्हिडीओ समोर आलेला आहे. हा व्हिडीओ पाहून औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली असून हे शहर उद्योगांसाठी पोषक नसल्याचा सूर उद्योगकांमध्ये उमटत आहे.

उद्योजकांना धमकावण्याचे यापूर्वी अनेक प्रकार 

औरंगाबादमध्ये उद्योजकांना धमकवाण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील एका उद्योजकाला तुला जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याचं सांगून एक लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शेख शहानूर आणि शेख इम्तियाज अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत सय्यद नजीर अहमद या उद्योजकाने दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली होती.

इतर बातम्या :

ते मध्यरात्री दोन वाजता मद्यधुंद अवस्थेत आले, 10 ते 12 वाहनांची तोडफोड, कल्याणमध्ये दहशत माजवणाऱ्यांचा सुळसुळाट

मोठी बातमी ! काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या

(ransom of 60 lakh rupees has been demanded to entrepreneurs in Aurangabad)