औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भर दिवसा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका रिक्षाचलाका अटक करण्यात आली आहे. आज (शनिवारी) शहरातील मोंढा नाका परिसरातून मुलीचे अपहरण करत रिक्षाचालकाने तिच्यासोबत छेडछाड केली होती. औरंगाबादमधील जिंसी पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे औरंगाबमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आनंद पहुळकर असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. (rickshaw driver arrested by Aurangabad police who tried to humiliate young girl)
औरंगाबादमध्ये आज (शनिवारी) भर दिवसा, शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौकादरम्यान एक तरुणी रिक्षात बसली होती. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली होती. त्यानंतर रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून तरुणीने उडी मारली.
औरंगबादेत भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे शहरात मुली असुरक्षित असल्याची टीका होऊ लागली होती. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत औरंगाबाद पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. तसेच त्याच्या मुसक्या आवळल्या. रिक्षाचालकाचे नाव आनंद पहुळकर असे असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.
दरम्यान, शहरातील संकटातील व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांना कधीही पोलिसांची मदत लागल्यास त्यांनी तत्काळ 0240-2240500 हा क्रमांक डायल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर कंट्रोल रुमवरून संबंधित परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मदतीसाठी पाठवले जाते. त्यामुळे आपण फोन केल्यावर पोलिस कधी येतील आणि कधी मदत मिळेल, या विचारात न राहता, संकटातील व्यक्तींना तत्काळ फोन केला पाहिजे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता दामिनी पथकाचे 1090, 1091 हे हेल्पलाइन नंबरही आहेत. (Due to fear of harassment young girl jumped off auto rickshaw in Aurangabad, Maharashtra)
इतर बातम्या :
रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या
औरंगाबादमध्ये तिरपी बस बेदरकारपणे दामटवणाऱ्या एसटी बसचालकावर अखेर गुन्हा
(rickshaw driver arrested by Aurangabad police who tried to humiliate young girl)