औरंगाबादः शहरातील उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे राज्य शासनाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. काल कोर्टात यासंदर्भातचे आदेश न्यायालयाने दिले. शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी भूसंपादन, गोलवाडी रेल्वे उड्डाणपूल आणि शहरातील उड्डाणपुलावरील (Aurangabad flyover) भेगांचे अंकेक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांसदर्भात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश कोर्टाने राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळाला दिले होते. मात्र तो देण्यात आलेला नाही. परिणामी न्यायालयाने याप्रकरणी 5 हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी भूसंपादन, गोलवाडी रेल्वे उड्डाणपूल आणि शहरातील उड्डाणपुलावरील भेगांचे अंकेक्षण करण्यासारख्या तीन प्रमुख मुद्द्यांच्या संदर्भाने अॅड. रुपेश जैस्वाल यांनी जनहित याचिका सादर केली. त्यावर यापूर्वी वेळोवेळी सुनावणी झाली.
कोर्टासमोर झालेल्या कालच्या सुनावणीत राज्य सरकारकडून शिवाजी नगर येथील भुयारी मार्गासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपये रक्कम देण्यात आल्याची माहिती दिली. यासंदर्भातील शपथपत्रही सादर केले. शिवाजी नगर रेल्वे गेटजवळ दररोज वाहतूक कोंडी होते. त्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव आहे. आता राज्य सरकारने निधी दिल्यानंतर येथील प्रश्न लवकर सुटेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
इतर बातम्या-