जालना: गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठं विधान केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही, असं राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं. (rt-pcr reports need for travelling in konkan during Ganesh festival, says rajesh tope)
राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरणाची अट असणार आहे. सर्व निर्णय विचार करून घेण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे जनहितासाठी तंतोतंत पालन करावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. तसेच चाकरमान्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान राज्यातील रात्रीच्या संचारबंदी विषयी केंद्राच्या सूचनेच्या निर्णयावर चर्चा आहे. याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. टास्क फोर्ससोबत चर्चा करून यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात काल 4 हजार 666 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले, तर 131 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 510 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या 3378, ठाण्यात 7283, तर पुण्यात 13 हजार 503 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 42 हजार 909 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकट्या केरळमध्येच 29,836 नवे रुग्ण सापडले असून राज्यात 75 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कालच्या दिवसात देशात 380 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत असून आता 3.76 लाखांच्या पार गेली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची धाकधूक वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 909 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 380 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 34 हजार 763 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 26 लाख 91 हजार 180 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 23 हजार 405 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 37 हजार 701 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 76 हजार 324 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 63 कोटी 43 लाख 81 हजार 358 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (rt-pcr reports need for travelling in konkan during Ganesh festival, says rajesh tope)
संबंधित बातम्या:
व्हर्जिनिटीसाठी तरुणींचं घातक पाऊल, ‘या’ पद्धतीवर बंदीची मागणी!
(rt-pcr reports need for travelling in konkan during Ganesh festival, says rajesh tope)