धावा धावा विहिरीत अस्वल पडलं, गावात नुसता धुमाकूळ, वन विभागानं उतरून पाहिलं तर निघाला….

| Updated on: Mar 08, 2022 | 3:33 PM

वनविभागाने घटनास्थळावर धाव घेतली आणि विहिरीतून उदबिल्ला बाहेर काढला. विहिरीत सापडलेला प्राणी उदबिल्ला निघाला तरी गावकऱ्यांची अस्वलाबद्दलची भीती कायम आहे.

धावा धावा विहिरीत अस्वल पडलं, गावात नुसता धुमाकूळ, वन विभागानं उतरून पाहिलं तर निघाला....
Follow us on

जालनाः जिल्ह्यातील भोकरदन(Bhokerdan) तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात अस्वल दिसल्याची गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. रविवारीदेखील रेणुकाई शिवारातील विहिरीत अस्वल पडल्याची अफवा (Bear) पसरली. रविवारी सायंकाळी एकजण विद्युत पंप चालू करण्यासाठी गेलेल्या गावकऱ्याला असा भास झाला. त्यानंतर गावात हीच चर्चा सुरु झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही तत्काळ माहिती देण्यात आली. अखेर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीतून प्राणी वर काढला. तो उदबिल्ला (Udbilla) असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी विहिरीवर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

अस्वलाची दहशत कायम

पिंपळगाव रेणुकाई शिवारात मागील महिनाभरापासून अस्वल असल्याची अफवा आहे. अनेकांना शेतात काम करताना अस्वलाचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या मनात अस्वलाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणेच बंद केले. रविवारी विहिरीत मृत अवस्थेत पाण्यावर तरंगलेला एक प्राणी दिसून आला. गावकऱ्याने शेतकऱ्यांना हा प्रकार सांगितला. हा प्राणी अस्वलच आहे, अशी चर्चा सुरु झाली. अखेर वनविभागाने घटनास्थळावर धाव घेतली आणि विहिरीतून उदबिल्ला बाहेर काढला. विहिरीत सापडलेला प्राणी उदबिल्ला निघाला तरी गावकऱ्यांची अस्वलाबद्दलची भीती कायम आहे.

अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी

विहिरीत उदबिल्ला निघाल्याने अस्वलाची भीती अजूनही येथील शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे. कारण अनेक वेळा साक्षात अस्वल दिसल्याचे शेतकरी सांगत आहेत. एका शेतकऱ्याला तर अस्वल पाहून चक्करच आली. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

इतर बातम्या-

लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना

Aurangabad | ‘ब्रेक द बायस’ संवादातून शेकडो युवतींना शृंखला तोडण्याची प्रेरणा, महिला दिनानिमित्त औरंगाबादेत स्तुत्य उपक्रम

सोबतच्या महिलांना Happy Women’s Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!