औरंगाबाद : औरंगाबाद वुमन इन स्पोर्ट्स (एडब्ल्यूआयएस) AWIS तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ औरंगबाद मेन व युनिव्हर्सल हायस्कूलच्या सहयोगाने 60 मीटर स्प्रिंट रेस (Sprint Race) स्पर्धेला औरंगाबादमध्ये भरगोस प्रतिसाद मिळाला. यात 900 पेक्षा अधिक महिला आणि मुलींनी प्रतिसाद दिला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अमृता तुपे, याधवी बिलवाल, मनीषा पाडवी आदींनी आपापल्या गटात ‘औरंगाबाची वेगवान महिला’ हा किताब आपल्या नावे केला. क्रीडा कार्यालयातर्फे (Sports ministry) अनेक योजना या खेळाडूंच्या कल्याणास्तव राबवल्या जातात आणि याचा लाभ घेण्यास खेळाडूंनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं. अस्सोसिएशन फॉर वूमन इन स्पोर्ट्सच्या अध्यक्षा नमिता दुग्गल, उपाध्यक्ष डॉ.अपर्णा कक्कड, सचिव प्राजक्ता बिर्ला, कोषाध्यक्ष डॉ.केजल भारसाखळे यांची समारोप्रसंगी उपस्थिती होती तर डॉ.दयानंद कांबळे, अनिल निळे, नंदू पटेल, विष्णू राऊत, ऋतुजा क्षीरसागर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात महत्वाचे योगदान दिले.
औरंगाबादची सर्वात वेगवान महिला ठरवणारी ही स्पर्धा आठ विविध वयोगटात पार पडली. पंचवीस हजारांची नगदी बक्षिसे यावेळी विजेत्यांना देण्यात आली. याशिवाय विजेत्यांना एक वेगळा असा मुकुट आणि विश्वसुंदरी स्पर्धेच्या विजेत्यांप्रमाणे साश प्रदान करण्यात आला. साठ मीटर धावण्याच्या या स्पर्धेला सर्व वयोगटातून उदंड प्रतिसाद मिळाला. युनिव्हरसह हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, जायंट्सचे अध्यक्ष दिनेश गंगवाल, प्राचार्या सीमा गुप्ता, राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे पंकज भारसाखळे, जिल्हा संघटनेचे डॉ.फुलचंद सलामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
– 10 वर्ष: अमृता तुपे (प्रथम), पायल घुसिंगे (द्वितीय), गौरी मालपाणी (तृतीय).
– 12 वर्ष: याधवी बिलवाल, आंचल कुटे, प्रतीक्षा मदन.
– 14 वर्ष: मनीषा पाडवी, रितिका चौधरी, जनंती वसावे.
– 16 वर्ष: ग्रीष्मा मांगुळकर, तनिषा पवार, रेवती तुपे.
– 18 वर्ष: अर्पिता वडकर, सदफ जैदी, मेहविश शेख.
– 20 वर्ष: प्रतीक्षा वसके, स्नेहा मदने, रसिक तरडे.
– 40 वर्ष: अश्विनी शिंदे, आरती गर्जे, कमल खंडाळे.
– खुला गट: धनश्री माने, संध्याराणी सावंत, इरम जैदी.
इतर बातम्या-