किराडपुरा राडा, कोट्यवधीचं नुकसान, झब्बू कुणाला? सरकारला की..? कायदा काय सांगतो? संभाजीनगरात काय घडामोडी?

| Updated on: Apr 07, 2023 | 2:06 PM

ही नुकसानभरपाई नेमकी कोणाकडून घेणार ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलिस दंगलीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

किराडपुरा राडा, कोट्यवधीचं नुकसान, झब्बू कुणाला? सरकारला की..? कायदा काय सांगतो? संभाजीनगरात काय घडामोडी?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, संभाजीनगर : राम नवमीच्या (Ram Navami) आदल्या दिवशी संभाजीनगरात (Sambhajinagar) झालेला राडा कुणी घडवला, लोकांची माथी भडकवण्यासाठी कोण जबाबदार होतं, यावरून राजकीय वातावरण तापलंय. तर दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींवर कारवाई सुरु आहे. किराडपुरा दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे तर आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय. या दंगलीत एकाचा मृत्यू झालाय तर पोलिसांच्या 10 ते 12 गाड्यांचं नुकसान झालंय. ही नुकसान भरपाई आता कुठून वसूल करणार हा प्रश्न आहे.

किती नुकसान झालं?

किराडपुरा प्रकरणात पोलिस दंगेखोरांना आणखी एक दणका देण्याच्या तयारीत आहेत. दगडफेक आणि जाळपोळीत झालेले नुकसान दंगेखोरांकडूनच भरपाई करण्याचा कायदा आहे. त्यानुसार पोलिस सविस्तर अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. गुन्ह्याच्या निकालावेळी न्यायालय शिक्षेत नुकसानभरपाईचा आदेश देते. दंगलीत जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

काय घडली नेमकी घटना?

रामनवमीच्या पूर्वसंध्येला 29 मार्च रोजी बुधवारी रात्री किराडपुरा येथील राम मंदिरासमोर सुमारे 400ते 500 जणांच्या जमावाने तब्बल दोन तास तुफान दगडफेक करून जाळपोळ केली होती . यात पोलिसांची 14 वाहने जाळली , तर तीन वाहने फोडली होती . याशिवाय , पोलिस वाहनातील वायरलेस , जीपीएस सिस्टीम , पी ए सिस्टीम जळून खाक झाली . सीसीटीव्ही कॅमेरे , पथदिवे जाळले होते . यात तब्बल अडीच कोटींचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीत केला होता. प्रत्यक्ष अहवालात हा आकडा काहीसा कमी होत आहे . तरीही , दंगलीतील जवळपास 80 टक्के आरोपी मजुरी करणारे आहेत.

दंगलखोरांकडून वसूल करणार?

ही नुकसानभरपाई नेमकी कोणाकडून घेणार ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलिस दंगलीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. अखेरीस , आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात जाईल . न्यायालयात सुनावणी होईल . त्यानंतर न्यायालय ज्या आरोपींना दोषी ठरवेल , त्या आरोपींना शिक्षा सुनावली जाईल. या शिक्षेदरम्यान सदर नुकसान भरपाई करण्याचे आदेश देण्यात येतील. मात्र दंगलीतील आरोपींपैकी बहुतांश लोक मजुर असल्याने ती कशी भरून निघणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.