…आणि समीर भुजबळांच्या ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’चं स्वरुप बदललं

| Updated on: Dec 18, 2020 | 2:29 PM

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं आश्वासन सभागृहात दिल्यामुळे आम्ही आजचा ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आभार मोर्चात बदलत आहोत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

...आणि समीर भुजबळांच्या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं स्वरुप बदललं
Follow us on

पुणे : ओबीसी आणि भटक्या विमुक्त जमातींनी पुण्यात मोर्चाची हाक दिली आहे. ओबीसी आरक्षण आणि मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शब्दछल होत असल्याचा आरोप केला जात आहे. तर औरंगाबादमध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात आयोजित मोर्चाचं स्वरुप बदललं आणि त्याचं आभार मोर्चात रुपांतर झालं. (Sameer Bhujbal Aurangabad OBC Morcha)

औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. माजी खासदार समीर भुजबळ मोर्चात सहभागी झाले. महात्मा फुले पुतळ्यापासून सुरु होणाऱ्या मोर्चासाठी अनेक ओबीसी बांधव उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

सभागृहातील आश्वासनामुळे आभार मोर्चा

दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं आश्वासन सभागृहात दिल्यामुळे आम्ही आजचा ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आभार मोर्चात बदलत आहोत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री आणि विरोधकांकडून ओबीसी बांधवांची फसवणूक”

“मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांकडून ओबीसी बांधवांची फसवणूक होत आहे. ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण देणार नाही म्हणणे, म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे. ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यांवर ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे मोर्चे आणि आंदोलने होणार आहेत. ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी संघर्ष सेना महाराष्ट्रात ठरल्याप्रमाणे मोर्चे मेळावे घेणार” असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला.

(Sameer Bhujbal Aurangabad OBC Morcha)