मुंबई : औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्व पक्षांना माहिती आहे. जे नामांतराला विरोध करतात त्या पक्षांना का भाजप विचारत नाही? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे, त्यावर फक्त सही शिक्का उमटायचा आहे, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. (Sanjay Raut on Abu Azmi Aurangabad renaming as Sambhajinagar)
औरंगाबादबाबत शिवसेनेची भूमिका सर्व पक्षांना माहिती आहे. औरंगाबाद आणि संभाजीनगर नावावर आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या काळातच हे नामांतर व्हायला हवे होते. ते शिवसेनेला प्रश्न का विचारतात, जे नामांतराला विरोध करतात, त्या पक्षांना का भाजप विचारत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
भाजप पक्षाला काय प्रॉब्लेम आहे. औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला, त्यावर केंद्र अजूनही निर्णय घेत नाही. भाजप नेते त्यावर का बोलत नाहीत, असा प्रतिप्रश्नच संजय राऊत यांनी विचारला.
शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आपल्या आपल्या इच्छेवर अवलंबून आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता. ते समजूतदार नेते आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असंही राऊत म्हणाले. (Sanjay Raut on Abu Azmi Aurangabad renaming as Sambhajinagar)
दरम्यान, लसीवर कोणत्याही पक्षाचा हक्क नसतो. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे सुपर मॅन आहेत. भाजपची लस न घेण्याबाबत ते मस्करीत बोलले असतील, असंही संजय राऊत म्हणाले.
Live : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/mR4GAF1sHP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2021
संबंधित बातम्या :
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का; किरीट सोमय्यांचा सवाल
‘चंद्रकांतदादांचे पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा’, राऊतांचा टोला
(Sanjay Raut on Abu Azmi Aurangabad renaming as Sambhajinagar)