चारित्र्याच्या गप्पा मारू नका, आम्ही बोललो तर बात दूर तक जायेगी; संजय शिरसाट यांचा प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर पलटवार

| Updated on: Jul 31, 2023 | 11:21 AM

पन्नास खोक्यांबद्दल तिला काय माहिती? ती दिल्लीत राहते. तिकडे बोलते. मेळावा, बैठकीला ही बाई कधी येत नाही. त्यामुळे किंमत द्यायची गरज काय? आम्हाला कोणी सोबत ठेवलंय?

चारित्र्याच्या गप्पा मारू नका, आम्ही बोललो तर बात दूर तक जायेगी; संजय शिरसाट यांचा प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर पलटवार
priyanka chaturvedi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद | 31 जुलै 2023 : प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्या पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं असं चंद्रकांत खैरेच म्हणाले होते, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. शिरसाट यांच्यावर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. शिरसाट हे त्यांच्या विधानातूनच त्यांचं चारित्र्य काय आहे हे दाखवत आहेत, अशी जोरदार टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. चतुर्वेदी यांचीही टीका शिरसाट यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यांनी चतुर्वेदी यांच्यावर आक्रमकपणे हल्ला चढवला आहे.

संजय शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी चारित्र्याच्या मुद्द्यावरून प्रियंका चतुर्वेदी यांना सूचक इशारा दिला. प्रियंका चतुर्वेदी यांनी चारित्र्यहीनतेच्या गप्पा मारू नये. आम्ही चारित्र्य काढायला लागलो तर बात दूर तक जायेगी. प्रियंका यांच्याबद्दल मी काहीच बोललो नाही. चंद्रकांत खैरे काय बोलले होते हे मी स्पष्ट केलंय, असं संजय शिरसाट म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंनी कांडी फिरवली

आम्ही खैरेंना घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा तुमचं पुनर्वसन करू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र ऐनवेळी आदित्य ठाकरे यांनी कांडी फिरवली आणि चतुर्वेदी खासदार झाल्या. त्यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सुंदरता पाहून चतुर्वेदी यांना खासदारकी दिली असं वक्तव्य केलं होतं, अशी आठवण शिरसाट यांनी सांगितली.

उपरे शिवसेना शिकवणार का?

प्रियंका चतुर्वेदी जिकडे जाल तिकडे भारी असतात. एका तासात फॉर्म भरून राज्यसभेच्या खासदार होतात. चतुर्वेदींऐवजी खासदारकी मुंबईच्या महिला नेत्यांना दिली असती तर चांगले झाले असते. रणरागिणींचा सन्मान केला असता तर बरं झालं असतं. हे असले उपरे आम्हाला शिवसेना शिकवणार का? असा सवाल त्यांनी केला.

मग लायकी कळेल…

पन्नास खोक्यांबद्दल तिला काय माहिती? ती दिल्लीत राहते. तिकडे बोलते. मेळावा, बैठकीला ही बाई कधी येत नाही. त्यामुळे किंमत द्यायची गरज काय? आम्हाला कोणी सोबत ठेवलंय? आमचं चारित्र्य काय? हे यांना काय माहिती? आम्ही 25 वर्षे निवडून येत आहोत, हे काय असंच होतं का? या लोकांनी एकदा निवडणूक लढवावी. मग यांना कळेल यांची लायकी काय?, असा हल्ला त्यांनी चढवला. हे फक्त स्टेटमेंट करणारे हाय प्रोफाइल लीडर आहेत. यांच्यावर कॉमन माणूस विश्वास ठेवणार नाही, पंतप्रधान काय आहेत हे देशाला आणि जगाला माहिती आहेत. कुणाच्याही बोलण्याने पंतप्रधानची उंची कमी होणार नाही, असंही ते म्हणाले.