नांदेड : मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत गंगापूर येथे आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. जगदीश कदम हे गेल्या पाच शतकांपासून लेखन करीत आहेत. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, व्यक्तिचित्र, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी रास आणि गोंडर, झाडमाती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर, ऐसी कळवळ्याची जाती हे कवितासंग्रह मुडदे, आखर, मुक्कामाला फुटले पाय हे कथासंग्रह लिहिले आहेत.
गाडा, ओले मूळ भेदी या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. बुडत्याचे पाय खोलात, वडगाव लाईव्ह ही नाटके लिहिली आहेत. सहयात्री हे ललित लेख आहे. साहित्य : आकलन आणि आस्वाद हा समीक्षेचा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गौतम बुद्ध ही चरित्र पुस्तके आहेत. गांधी समजून घेताना हे वैचारिक पुस्तक लिहिले. कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये त्यांच्या नाटकांचा अनुवाद झाला आहे.
अण्णाभाऊ साठे कथास्पर्धा, बी. रघुनाथ कथास्पर्धा,
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार – १९९८(रास आणि गोंडर)
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड़मय निर्मिती पुरस्कार – १९९९ (बुडत्याचे पाय खोलात)
विशाखा प्रथम काव्य पुरस्कार,नाशिक – १९९९
भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, कोपरगाव – १९९९
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे
ऊर्मीचा ना.धों.महानोर साहित्य पुरस्कार,जालना २००९
करकाळा येथील जनसंवाद साहित्य पुरस्कार २००८
जि.प.नांदेडचा नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार २००९
आविष्कार साहित्य मंडळाचा भारतभूषण पुरस्कार २००९
कै.विलास भोसले राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार, उदगीर २०१३
अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार,पुणे २०१३
सत्यशोधक साहित्य पुरस्कार,१४ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन, नांदेड २०१३
प्रसाद बन साहित्य पुरस्कार २०१५
दर्पण साहित्यिक-पत्रकार पुरस्कार २०१७
कुमार देशमुख नाट्य पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद २०२०
गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार,गदिमा प्रतिष्ठान व कामगार साहित्य सभा,पुणे २०२०
सह्याद्री साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे २०२१
यशवंतराव चव्हाण स्मृती समिती,अंबाजोगाई, यशवंतराव चव्हाण स्मृती सन्मान २०२१
केशवसुत काव्यप्रतिभा पुरस्कार, मालगुंड
अध्यक्ष, पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन, पेठशिवणी जि.परभणी २००३
अध्यक्ष, आविष्कार साहित्य संमेलन, हदगाव २००३
अध्यक्ष, तिसरे शिक्षक साहित्य संमेलन, नांदेड २०१६
अध्यक्ष, पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन, पळसप (उस्मानाबाद)२०१७
अध्यक्ष, पहिले राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन, बरबडा २०१७
राज्यस्तरीय कविसंमेलन नांदेड महापालिका २०२२ अध्यक्ष
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, घुमान परिसंवाद सहभाग-निमंत्रित वक्ता
तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन सिंगापूर येथे निमंत्रित वक्ते २०११