दत्ता कनवटे, TV 9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : सिल्लोडमधील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी चांगलीच फटकेबाजी केली. गुलाबराव पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांबरोबर पहिलं तिकीट काढणारा हाच माणूस. तो म्हणजे अब्दुल सत्तार. सत्तार हे जसे बोलण्यात हुशात आहेत तसेच काम करण्यात हुशार आहेत.
गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की, मी नंबर 33 ला होतो. तीर्री पे तीर्री. हे लोकं गेल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांकडं गेलो. लोकं आमच्याविरोधात बोलतात. आमच्यावर टीका करतात. सत्तार साहेब तर बऱ्याच पक्षात गेले. पण, ते निवडून आले. ते तर कलाकार आहेत.
पण, मी शाळेतलं दप्तर हातात होतं तेव्हापासून शिवसेनेचं काम केलं. शि म्हणजे शिस्तबद्द, व वचनबद्ध, से सेवाभावी, ना म्हणजे नामर्दांना जिथं स्थान नाही ती संघटना. हे करत असताना 35 वर्षे एक झेंडा, एक नेता, एक पक्ष, एक विचार. वंदनीय बाळासाहेब ठाकरे.
40 लोकांच्या जत्थ्यात पहिले जाणारे अब्दुल सत्तार. आम्ही समजवायला गेलो. खासदार महामंडलेश्वर श्री श्री श्री संजयजी राऊत यांनी सांगितलं तुम्हाला जायचं असेल तर जा. म्हणाले उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आम्ही उद्धव साहेबांना सांगून निघालो. कोण म्हणतो गद्दारी केली, असा सवालही त्यांनी केला.
साधा नगरसेवक निघाला तर झोप येत नाही. 40 आमदार निघाले तर तुम्हाला काही वाटत नाही. याचा अर्थ नेतृत्व कमकुवत आहे, असं मानायला काही हरकत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही 50 कोटी घेतले. पश्चिम बंगालला एक रेड पडली. 27 कोटी आणायला टेम्पो लागली. 50 कोटी कोणत्या गाडीत आणले. ते तर दाखवा, असा प्रश्न त्यांनी विचारला.
पहिल्या टर्मचे आमदार गेले. समजू शकतो. मंत्री जातात तेही आठ-आठ. लाल काला झाला असता तर भावपूर्ण श्रद्धांजली होती. हा सट्टा कसा खेळलो आम्ही. आम्ही आमच्या राजकारणाचा सट्टा खेळलो.
कुणीतही इंदासे (सुषमा अंधारे)नावाची बाई आली आहे. ती दीड महिन्यांपूर्व उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करायची. आता ती त्यांचा नेता झाली. बम बम बोलो बेच दे सोने चांदी के गोले. कमायंगे गुरु तो खायेंगे चेले, अशी कोटी करायलाही गुलाबराव पाटील विसरले नाही.