VIDEO: हम किसी को टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही; चंद्रकांतदादांचा पलटवार

| Updated on: Sep 04, 2021 | 3:42 PM

आम्ही पाठीत खंजीर खूपसत नाही. समोरून कोथळा बाहेर काढतो, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. (Chandrakant Patil)

VIDEO: हम किसी को टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही; चंद्रकांतदादांचा पलटवार
chandrakant patil
Follow us on

जालना: आम्ही पाठीत खंजीर खूपसत नाही. समोरून कोथळा बाहेर काढतो, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. हम किसी को टोकेंगे नही, अगर किसीने टोका तो छोडेंगे नही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. (state BJP chief Chandrakant Patil reply to sanjay raut on his comment)

चंद्रकांत पाटील आज जालन्यात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राऊतांवर पलटवार केला. संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार आहेत हे त्यांनी सांगावं. नारायण राणेंनी एक थोबाडीत मारली असती तर असं म्हटलं होतं. त्यावर त्यांना अटक केली. मग कोथळा काढला असता किंवा कोथळा काढू यावर काय करणार आहात? हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं, असं पाटील म्हणाले.

आम्ही सज्जन, सुसंस्कृत

आम्ही एवढे कमजोर नाहीत. संजय राऊत आम्ही एवढे कमजोर नाही. आम्ही सज्जन आहोत. सुसंस्कृत आहोत. हम किसी को टोकेंगे नही, यदी किसीने टोका तो छोडेंगे भी नही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राऊत शिरूरला आले होते. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

चंपा म्हणणं बरोबर नाही

चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले 105 आमदार आहेत तरी आमचा मुख्यमंत्री नाही. 105 वाले चोळत बसलात. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

अनेक बोचकी शिवसेनेतून गेली

आता राज्यात ठाकरे सरकार आहे. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. घरवापसी म्हणता तुम्ही त्याला. रागानं घरं सोडायचं नसतं. शिवसेना हे मंदिर आहे. मधल्या काळात जे शिवसेनेच नुकसान झालं ते न भरून येणारं आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतला भगवा खाली उतरला. घरात भांडण हे होत असतात. आपण टोकाचे निर्णय घेतो. जो शिवसेनेतून दूसऱ्या घरात जातात ते सुखी नसतात. अनेक बोचकी शिवसेनेतून गेली. जे गेले त्यांना आता परत घ्यायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. (state BJP chief Chandrakant Patil reply to sanjay raut on his comment)

 

संबंधित बातम्या:

आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर, NCP च्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची डरकाळी

समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवावं; राजू शेट्टी आक्रमक

(state BJP chief Chandrakant Patil reply to sanjay raut on his comment)