औरंगाबाद : माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी बांधावर संवाद साधला. सोबतच त्यांनी चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. या गर्दीत एक 14-15 वर्षांची मुलगी उद्धव ठाकरे यांना भेटायला आली. तीनं सोबत स्वतः काढलेलं चित्र आणलं होतं. ते उद्वव ठाकरे यांना दाखविलं. सोबत चंद्रकांत खैरे होते. तसेच अंबादास दानवेही होते.
मुलगी म्हणाली, घरीचं चित्र काढलं. ठाकरे म्हणाले, पुढं काही करणार का चित्रकलेत. मुलगी म्हणाली, बघू जमलं तर.. यावर ठाकरे यांनी मुलीचा उत्साह वाढविला. म्हणाले, आवड असेल तर काढत राहा चित्र.
दुसऱ्या एक घटनेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील गावांचा दुष्काळ पाहणी दौरा करत होते. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिला आहे. त्यातच त्यांच्या या दौऱ्यात एक चिमुकला सगळ्यांचं आकर्षण ठरला.
कारण उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद संपवत त्यांनी मुलाला जवळ घेतलं. त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केलं. त्यास आशीर्वाद देत धीरही दिला आहे. या पावसात त्यांच्या शेतीचे नुकसान झालं. त्यामुळे त्या चिमुकल्याचा शाळेचा खर्चदेखील उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.
उद्धव काकांनी मला आशीर्वाद दिला. अशा भावना त्या चिमुकल्यानं व्यक्त केल्या आहेत. त्याच चिमुकल्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी बातचित केली. त्यावेळी ते कुटुंबीय आनंदित दिसत होते. जणू काही संकट दूर झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होते.