औरंगाबाद: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेड्याच्या पारावर बसून हरिपाठ म्हणत बसलो असतो, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हे उद्गार काढले. (union minister Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government)
गेली 35 वर्षे या जिल्ह्यातील लोकांनी आमदार, खासदार केलं. तुम्ही मला आमदार, खासदार केलं नसतं तर मी रेल्वे राज्यमंत्री झालो असतो? मी कोयला मंत्री झालो असतो? मी काय ग्राहक संरक्षण मंत्री झालो असतो? तुम्ही निवडून दिलं नसतं आणि गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेडच्या माऊलीच्या पारावर मी हरिपाठ म्हणत बसलो असतो. मी कलकत्ता, लखनऊ, दिल्ली या कितीही गोष्टी करत असलो, कितीही वर गेलो तरी माझ्या मतदारांना मी विसरणार नाही, अशी ग्वाही रावसाहेब दानवे यांनी दिली.
पतंग आकाशात असते पण जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात तिची दोरी असते. पतंगाला दिशा देण्याचं काम जमिनीवरचा माणूस करतो. जोपर्यंत जमिनीवरच्या माणसाच्या हातात पतंग आहे. तोपर्यंत पतंगाला दिशा आहे. पण जेव्हा पतंगाची दोरी सुटली की तर पतंग कोणत्या गटारेत पडेल सांगता येत नाही. आम्हा पुढाऱ्यांची अवस्था अशी आहे. तुमच्या हातात दोर नीट आहे, म्हणून आमचा खेळ सुरू आहे. तुम्ही दोरा सोडला तर आम्ही कुठे जाऊन पडू सांगता येत नाही. त्याचीच जाणीव ठेवून आम्ही मंत्रिमंडळात काम करत असतो, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बैलांच्या शर्यतीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. बैलगाडा शर्यती व्हावी ही भाजपची सुरुवातीपासून भूमिका आहे. बैलांच्या शर्यतीबाबत आम्ही राष्ट्रपतीना विनंती केली आहे. 12 महिने शेतकरी बैलाला जीव लावतात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली पाहिजे, असं ते म्हणाले.
तामिळनाडूच्या आरक्षणाला स्थगिती मिळत नाही. पण आमच्या आरक्षणला स्थगिती मिळते याचा अर्थ हे सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं आहे, अशी टीकाही त्यांनी आघाडी सरकारवर केली.
केंद्रीय उद्योग मंत्री ठाकरे स्मृती स्थळावर गेल्यावर तिथे गोमूत्र शिंपडण्यात आलं. त्यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे हे या राज्यातील मान्यता प्राप्त नेते आहेत. त्यांच्या स्मारकावर कुणालाही बंदी घालता कामा नये. इंदिरा आणि अटलजींच्या स्मारकावर जायला कुणालाही बंदी नाही, इकडे अशा पध्दतीने गलिच्छ राजकारण फक्त तेच करू शकतात, अशी टीका त्यांनी केली. इंदिरा गांधी यांचे स्मारक म्हणण्याऐवजी सोनिया गांधी स्मारक असे म्हणाले होते. त्यांनी नंतर ही चूक सावरून घेतली. (union minister Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 August 2021 https://t.co/9l6lHBm7wF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2021
संबंधित बातम्या:
‘शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
(union minister Raosaheb Danve slams Maha Vikas Aghadi government)