मराठा आरक्षणाला विरोध करणारे अनेक जण न्यायालयात; विनोद पाटलांचे न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे अश्वासन

| Updated on: Aug 28, 2022 | 1:55 PM

विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, मी नाही सर्व समाज व देश सातारा व कोल्हापूरच्या गादीचा सन्मान करतो,त्यामुळे त्यांना एका समाजापूरते मर्यादित करू नका आणि कोणताही वाद निर्माण करू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणाला विरोध करणारे अनेक जण न्यायालयात; विनोद पाटलांचे न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे अश्वासन
Follow us on

औरंगाबादः सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) 3 विरूद्ध 2 ने आरक्षण (Reservation) रद्द केले असल्याने सर्व समाजान एकत्र येऊन विद्यांर्थ्यांना मदत केली पाहिजे असं मत मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी व्यक्त केले. राज्यातील काही अधिकाऱ्यांकडून सरकारपर्यत आकडे दिले नाही, सुपर मेमरीच्या सर्व विद्यार्थ्यांचेची आकडेवारीही दिली गेली नाही, तरीही या सर्व विद्यार्थ्यांना न्यायालयात जाऊ नका असं आवाहनही विनोद पाटील (Maratha Leader Vinod Patil) यांच्याकडून करण्यात आले आहे. आपल्याला एवढ्यावरच न थांबता आपण न्यायालयाबेहेर जाऊन आपण तोडगा काढू असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. मॅटमध्ये सरकारसमोर काय बाजू मांडायची ते ठरवले गेले पाहिजे, मराठा आरक्षणाला विरोध करणारे बरेच लोकं न्यायालयात गेले असल्याचा आमचा दावा आहे, त्यामुळे आमचा संयम संपला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरक्षणप्रकरणी या सरकारने सुपर पॉवरचा वापर केला गेला आहे, त्य़ाविरोधात कोणी न्यायालयात जाऊ नये असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी विनोद पाटली यांनी सांगितले की, आरक्षणासाठी आम्ही शांतपमे वागलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारवर प्रचंड दबाव

राज्यातील आरक्षणामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला असून त्यामुळे सरकारने सुपर मेमरीचा निर्णय घेतला गेला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याबद्दल कोणीही राजकारण करू नये आणि याबद्दल कोणी वादही करु नये असंही यावेळी सांगण्यात आले.

आरक्षण प्रश्नावरुन अधिकाऱ्यांनाही धारेवर

आरक्षण प्रश्नावरुन अधिकाऱ्यांनाही धारेवर धरण्यात आले, आरक्षणामुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा आधार मिळतो, त्यांचा विकास होतो मात्र प्रशासनातील काही अधिकारी जाड कातडीचे असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. काही अधिकारी हे जाणीव पूर्वक आरक्षणासंदर्भातील यादी सरकारपर्यंत जाऊ देत नाही असं सांगत अधिकाऱ्यांवरही निशाणा साधण्यात आला.

ईडब्लूचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्थगिती

यावेळी विनोद पाटील यांनी सांगितले की, कोणत्याही न्यायालयाने ईडब्लूचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे आरक्षण मिळाल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करा, सुपर मेमरीचा लाभ घ्या असंही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सातारा व कोल्हापूरच्या गादीचा सन्मान

विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, मी नाही सर्व समाज व देश सातारा व कोल्हापूरच्या गादीचा सन्मान करतो,त्यामुळे त्यांना एका समाजापूरते मर्यादित करू नका आणि कोणताही वाद निर्माण करू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी मविआवर टीका करताना म्हणाले की, मागच्या सरकारला आमचा तिरस्कार होता तर आताचे मुख्यमंत्री हे मराठा आहेत. त्यातच मागचे सरकार व आताच्या सरकारला न्यायालयीन माहीती आहे कारण ते त्यातूनच सत्तेत आले असल्याचे सांगितले.