औरंगाबादः राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्येही (Wine in Mall and Supermarket) आता वाईन विकण्यास परवानगी असेल असा निर्णय राज्यमंत्री मंडळ्याच्या बैठकीत (Cabinet meeting) नुकताच घेण्यात आला. यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर राज्यभरातून टीकेची झोड उठवली जात आहे. विशेषतः भाजपने या निर्णयावरून शिवसेना आणि सरकारला धारेवर धरलं आहे. काही काँग्रेस नेत्यांनीही या प्रकाराची निंदा केली आहे. यातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीही टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निर्णयाअंतर्गत औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वतः फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या नव्या वाईन विक्रीच्या धोरणाला खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. तसेच यावेळी त्यांनी केवळ टीका न करता सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, सरकारच्या या नियमानुसार, ज्या दुकानात आधी वाईन येईल, ते दुकानच आम्ही फोडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमोर मी ही कृती करणार. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतालाय, असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतंय. मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाची परवानगी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली.
खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या या वाईन धोरणाविरोधात लढा देण्यास महिला वर्गालाही आवाहन केले आहे. आया बहिणींनी पुढे येऊन ही वाईनची दुकानं फोडली पाहिजेत, असेही खासदार जलील म्हणाले. भाजप, काँग्रेस या निर्णयाविरोधात फक्त निंदा करतायत, मात्र आम्ही कृती करू. शहरात सरकारच्या नव्या धोरणानुसार, वाईनचं दुकान उघडलं तर मी स्वतः दुकान फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
इतर बातम्या-