भिडे वाड्या समोर पुण्यात आंदोलनकर्ते उपोषण का करताय? उपोषण करण्यामागे काय आहे ऐतिहासिक संदर्भ, जाणून घ्या

| Updated on: Dec 20, 2022 | 11:03 AM

पुणे येथील भिडे वाड्याची परिस्थिती पाहता अत्यंत खराब झाली आहे, भिडे वाड्याचा इतिहास जपला जावा यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली आहे.

भिडे वाड्या समोर पुण्यात आंदोलनकर्ते उपोषण का करताय? उपोषण करण्यामागे काय आहे ऐतिहासिक संदर्भ, जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
Follow us on

अभिजीत पोते, पुणे : पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी आज पुण्यात उपोषण केले जात आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीच्या लेकी यांनी हे आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाला सकाळी 8.30 पासून सुरुवात झाली आहे. या आंदोलनात फुले-शाहू-आंबेडकर प्रेमींनी उपोषणाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे. फुले दाम्पत्यांनी भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. फुले दाम्पत्यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा भिडेवाड्याची दुरावस्था झालेली आहे. हा भिडेवाडा शेवटच्या घटका मोजत आहे. तरी देखील प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या सर्वांच्या विरोधात सावित्रीच्या लेकी भिडेवाड्यासाठी उपोषणाला बसलेल्या आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी देखील आपल्या उपोषणाला पाठिंबा दिला व ते स्वतः उपोषणाला बसले आहे.

पुणे येथील भिडे वाड्याची परिस्थिती पाहता अत्यंत खराब झाली आहे, भिडे वाड्याचा इतिहास जपला जावा यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

भिडे वाड्याच्या बाबतीत अनेक लोकप्रतिनिधींनी विधीमंडळातही आवाज उठवला आहे. फुले जयंतीच्या दिवशीही याबद्दल मागणी केली जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी जोर धरून आहे, मात्र शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची परिस्थिती आहे.

याच मागणीला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण करत मागणी केली आहे. आज हे उपोषण सुरू झाले आहे.

भिडे वाडा ही इमारत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा होती.