मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून अंजनगाव सूर्जी तालुक्यातील शेतकरी अशोक भुयार यांनी 22 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ‘घडलेली घटनाही दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. माझ्याकडून जर फोन उचलला गेला नाही, तर एक मेसेज करा. अडचणी सोडवण्यासाठी मी माझे मंत्रिपपद पणाला लावेल, असे बच्चू कडू (Bachhu kadu) म्हणाले . तसेच, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबला शासनातर्फे मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते मुंबईत टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Bachhu kadu on Amravati farmer suicide)
यावेळीबोलताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. “घडलेली घटना ही अत्यंत दुर्वैवी आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कोरवाई केली जााईल,” असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने त्याच्यावर झालेला अन्याय सांगितला असता, तर ही घटना घडली नसती, असे म्हणत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटणार असल्याचे कडू यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, या शेतकऱ्यांने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख करत बच्चू कडू यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी या शेतकऱ्यांने केली होती. त्यानंतर शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्यामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप केला जात होता. बच्चू कडू यांनी हा आरोप फेटाळत, ‘शेतकऱ्याने अगदी सद्भावनेतून मला पत्र लिहिले होते. शेतकऱ्याने माझ्यामुळे आत्महत्या केल्याची अफवा पसरवली जात आहे. हे साफ चुकीचं आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी अशोक भुयार यांनी 22 डिसेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली. व्यापाऱ्याने संत्र्याचे पैसे न दिल्याने आणि पोलिसांनीही सहकार्य न केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी केला होता. व्यापारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा दावाही त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. बच्चू कडू यांच्याकडे भुयार यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी चिठ्ठीतून केली होती.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा: देवेंद्र फडणवीस
विदर्भच काँग्रेसला दिशा देईल, थोरातांच्या उपस्थितीत वडेट्टीवारांचं वक्तव्य
वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेला शिवसेना उमेदवार वडेट्टीवारांच्या उपस्थितीतच काँग्रेसमध्ये
(Bachhu kadu on Amravati farmer suicide)