बदलापूर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सरकारला द्यावे लागणार ‘हे’ पुरावे, कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश

| Updated on: Oct 03, 2024 | 4:40 PM

अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सरकारी वकिलांसह आरोपीच्या वकिलांनाही सुनावले.

बदलापूर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सरकारला द्यावे लागणार हे पुरावे, कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश
Follow us on

Akshay Shinde Encounter Case : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सरकारी वकिलांसह आरोपीच्या वकिलांनाही सुनावले.

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीशांनी अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरलं होत? असे अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी सरकारी वकिलांनी ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बॉटल दिली होती, ती सापडली आहे, असा युक्तीवाद केला.

बंदुकीच्या फिंगर प्रिंटच्या संदर्भात माहिती द्या

यावर कोर्टातील न्यायाधीशांनी चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? असा सवाल विचारला. यावेळी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी बंदुकीच्या फिंगर प्रिंटच्या संदर्भात माहिती द्या, असे आदेश यावेळी दिले.

पुढील सुनावणी 18 नोहेंबरला

याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर करावी. तसेच पुढील सुनावणी येत्या 18 नोहेंबरला होईल. त्यावेळी सरकारने बॅलेस्टिक रिपोर्ट, बुलेट शेल आणि पोलिसाला लागलेल्या गोळीची जखम यासंदर्भात सगळे रिपोर्ट कोर्टात सादर करावे, असे यावेळी सांगितले.

दरम्यान अक्षय शिंदे याला बेड्या ठोकल्या होत्या. पण त्याला पाण्याची तहान लागली. त्यामुळे पाणी पिण्यासाठी पोलिसांनी त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या होत्या. पण त्यावेळी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या कंबरेला असलेली बंदूक काढून गोळीबार केला, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. त्यावर कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी कोर्टाने अक्षय शिंदे याच्या वकिलांनादेखील सुनावलं.