Akshay Shinde Encounter Case : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर आता विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार आहे. अक्षय शिंदे याने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले. यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने 2 राऊंड इतरत्र फायर केले. यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली. ही गोळी आरोपी अक्षय शिंदेंला लागली आणि तो जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे. आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने याप्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात होती. अखेर आता याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.
तर दुसरीकडे अक्षय शिंदे एन्काऊंटर झालेल्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. या टीमकडून ही घटना नेमकी कशी घडली? यावेळी नेमकं काय घडलं? याचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा घेतल्यानंतर फॉरेन्सिक टीमकडून एक अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला जाईल.
बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अक्षय शिंदे हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता. यानंतर तपासासाठी ठाण्यातील पोलीस अधिकारी ट्रान्सफर वॉरंट घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते.
काल संध्याकाळी 5.30 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ठाणे येथे घेऊन जात असताना संध्याकाळी 6.00 ते 6.15 दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले. यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने 2 राऊंड इतरत्र फायर केले.
यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली. ही गोळी आरोपी अक्षय शिंदेंला लागली आणि तो जखमी झाला. यानंतर पोलीस पथकाने तात्काळ अक्षय शिंदेला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदेला मृत घोषित केले.