बदलापूरमध्ये सकाळपासून आतापर्यंत काय काय घडलं?; A टू Z घटनाक्रम वाचा…

| Updated on: Aug 21, 2024 | 2:59 PM

बदलापूर या संवेदनशील रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. या वेळी रेल्वे गाड्यांच्या गोंधळामुळे नव्हे तर शाळेतील बालिकांचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आंदोलकांनी रेल्वे स्थानकाचा ताबा घेत रेल रोको केला आहे.

बदलापूरमध्ये सकाळपासून आतापर्यंत काय काय घडलं?; A टू Z घटनाक्रम वाचा...
Follow us on

बदलापूर येथील एका प्रतिष्ठीत शाळेत शिशुवर्गातील बालिकांचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकारानंतर पालिकांनी तक्रार करुनही बदलापूर्व पोलिसांना शाळेविरोधात तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याने या प्रकरणाचा भडका उडाला आहे. संतप्त आंदोलकांना सकाळपासून बदलापूर स्थानकांत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यानची वाहतूक ठप्प झालेली आहे. अंबरनाथ आणि कर्जत दरम्यानच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक संपूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांना कल्याणपर्यंत खाजगी वाहने किंवा रिक्षाने येऊन त्यानंतर कल्याण ते सीएसएमटी असा प्रवास करावा लागत आहे. मुंबईत येणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्यांनी कर्जत- पनवेल मार्गे वळविण्यात आले आहे. बदलापूर स्थानकातील आंदोलनाची दखल महिला बालआयोगाने देखील घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत घडलेल्या घटनेबद्दलचे अपडेट्स:-

• बदलापूर ( पूर्व ) येथील एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना कामावरुन काढण्यात आले आहे.

• पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.

• संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेश.

• संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले आहे. तुरळक दगडफेकही झाली आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असे जाहीर करुन जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत.

• सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देश दिले आहे.

• पालकांना झालेल्या मन:स्तापाबद्दल संबंधित संस्थेने माफी मागितली आहे.

• कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये, जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

•जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत.

•रेल्वे रुळांवरील आंदोलकांनी पोलिसांनी प्रयत्न करताच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली असून यात चार ते पाच पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे.

• आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्यात यावी ही मागणी सरकारकडे केली आहे.

• मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पोलीसांनी गुन्हा दाखल करायला 12 तास का घेतले असा सवाल केला आहे.

• बदलापूर स्थानकातील आंदोलनाची दखल महिला बालआयोगाने देखील घेतली असून आयोगाचे पथक दिल्लीतून बदलापूरला चौकशीसाठी येणार आहे.

• उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे.

• भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.