बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने अनावरण केलं. यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड उपस्थित होते. या पुतळ्याच्या अनावरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हायड्रोलिक ट्रॉलीच्या माध्यमातून पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.
त्यानंतर जाहीर सभेला संबोधताना त्यांनी बदलापूर शहरात एमएमआरडीएची अडकलेली सगळी कामं पूर्ण करू आणि एमएमआरडीएचा निधी बदलापूरपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसंच पाच वेळा निवडून आलेले किसन कथोरे हे मंत्री झाले नसले, तरी प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे किसन कथोरे हेच तुमचे मुख्यमंत्री आहेत, काळजी करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जय भवानी जय शिवाजी अशी जोरदार घोषणाबाजी केली. “बदलापूरमध्ये शिवजयंतीच्या पूर्व संध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनावरण करण्याची संधी मिळाली यासाठी सर्वाचे आभार. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जोरदार भाषण केले. बहिणींचा आशीर्वाद असं मिळालं की सगळ्यांचा सुफडासाफ केला. त्याबद्दल आईचा आशीर्वाद असा आहे की आमचा कोणी काही वाकड करू शकत नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आज आपण जगतो आहोत. आज आमचा स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे याचे एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे. त्या काळात राजा मुघलांची गुलामगिरी करायची. त्यावेळेला जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लढायला शिकवलं. प्रचार आणि बलात्कार पाहायला मिळतात शिवबा तुला माझी आण आहे, तुला या मराठी मुलकाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावंच लागेल आणि आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवराय हे मैदानामध्ये उतरले. मुघलांकडे मोठे सरदार मोठमोठ्या पगारवर होते. ते पगारी नोकरदार होते. लढणार मात्र आमचे मावळे मात्र अर्धपोटी राहून त्या ठिकाणी लढायचे”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
“छत्रपती शिवाजी महाराज हे एक लढाऊ सोबत एक नियोजक देखील होते. कोणाकडून टॅक्स घ्यायचा, कोणाकडून घेऊ नये. कशा पद्धतीत घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहून ठेवली. म्हणून खऱ्या अर्थाने या देशांमध्ये महिलांना सन्मान देणारा राज्य जर कुठलं होतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होतं आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं तर आपल्या सगळ्यांचे रक्त सळसळतं. आमच्यासारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य करताना त्या ठिकाणी कोणाकडे पाहून राज्य करावे असा मनात विचार येतो, त्यावेळी एकीकडे भारताचा संविधान असतं आणि त्याचबरोबर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“पाणी संबंधात मी उद्या माननीय उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून ती फाईल नगर विकास खात्याकडून मंजूर करून घेईल. तुमच्या पाण्याचा विषय देखील या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लागेल. ब्लू लाईन, रेड लाईन विषय नवीन डीसीआर आपण तयार करतो. ज्या डीसीआरमध्ये पूर्ण रेषेमध्ये कुठे, कसं बांधकाम करता येईल. यासंदर्भात आपल्याला काही नियमावली तयार करता येणार आहे. उल्हास नदीवर आपण काही धरण देखील बांधतो आहोत. ती धरण बांधल्यानंतर ऑटोमॅटिक ही जी रेषा आहे, ती पुरेशा या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे आणि त्यातल्या या शहराला एक मुक्ती मिळणार आहे. उल्हास नदीच्या खोलाच्या गाळ काढण्याचं या आपण सुरू करू”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले